पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते कवलापुरात विविध विकास कामांचे उद्घाटन

सांगली : पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते कवलापुरात विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जयश्री पाटील, माजी सरपंच निवास पाटील, भानुदास पाटील, संतोष मालकर, उत्तम पाटील, दीपक पाटील, राहुल मालकर, एल. बी. पवार, संजय मुळे, दादासो चव्हाण, सचिन माळी, विलास नलावडे, सदाशिव पाटील, प्रविण पाटील, रोहित पाटील आदि उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते कवलापूर येथील दंत महाविद्यालयाकडे जाणाऱ्या 25 लाख रूपये रक्कमेच्या रस्ताचे उद्घाटन करण्यात आले. तसेच खेडकर कॉलनीतील अंतर्गत रस्त्याचे मुरूमीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. याबरोबरच ज्योतिर्लिंग मंदिर व एस टी पीकअप शेडचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच त्यांनी स्वराज्य दुर्गनाथ प्रतिष्ठान कवलापूर व इंडियन मित्र मंडळ यांनी केलेल्या किल्ल्याची पाहणी केली.