महाराष्ट्र

दुधोंडी येथील अक्षय कदम यांचे अकाली निधन

 

दर्पण न्यूज पलूस  :-दुधोंडी गावचे सुपुत्र हसमुख आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व असलेले अक्षय अरविंद कदम यांचे अकाली निधन झाले. दिनांक 05/03/2025 रोजी  त्यांनी या जगाचा निरोप घेतला, आणि त्यांच्या जाण्याने मित्रपरिवार, कुटुंब, तसेच संपूर्ण समाजात शोककळा पसरली आहे अक्षय कदम एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते . अक्षय हा त्यांच्या आनंदी आणि हसतमुख स्वभावाने सर्वांच्या मनात घर करून होता. गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करणं हा त्यांचा सहज स्वभाव होता.
कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते जे के (बापू) जाधव व मानसिंग बँकेचे अध्यक्ष सुधीर (भैय्या) जाधव यांचे ते अत्यंत जवळचे व निकटवर्तीय कार्यकर्ता सहकारी असल्याने त्यांच्यावर व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वर व संपूर्ण दुधोंडी गावावर व मित्र परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
संकटसमयी मित्रांसाठी तो कायम खंबीरपणे उभे राहायचा. त्यांची जागा कधीच भरून निघू शकणार नाही.
समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची तळमळ नेहमी दिसून यायची. गरजूंना मदत करणे, सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेणे ही त्यांची विशेष वैशिष्ट्ये होती.
तसेच कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी समर्थपणे सांभाळणारा एक आदर्श मुलगा आणि बंधू अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
प्रत्येकगोष्टीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची त्यांची सवय होती. त्यामुळे त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला प्रेरणा मिळत असे.
अक्षय यांची आठवण सदैव हृदयात राहील
त्यांची हसरी मुद्रा, मैत्रीतील आपुलकी आणि दिलखुलास स्वभाव हा कायम आठवणीत राहील. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही भरून निघणार नाही. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
त्याच्या पश्चात आई-वडील भाऊ चुलते चुलती, चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे
रक्षाविसर्जन विधी शुक्रवार दिनांक 7/ 3/ 2025 रोजी दुधोंडी येथे ठीक 09.00 वाजता होणार आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!