महाराष्ट्रमाहिती व तंत्रज्ञानसामाजिक
भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडीचे अध्यक्ष गिरीश चितळे यांच्याकडून वाचनालयास भा. रा. भागवत यांच्या फास्टर फेणे पुस्तकांचा संच भेट

दर्पण न्यूज भिलवडी/ पलूस:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडीचे अध्यक्ष गिरीशजी चितळे यांनी वाचनालयास भा. रा. भागवत यांच्या फास्टर फेणे पुस्तकांचा संच भेट दिला. या पुस्तकांचा स्वीकार वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी केला.
यावेळी वाचनालयाचे संचालक प्रदिप शेटे, जी. जी. पाटील, महादेवराव जोशी व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते गिरीश चितळे यांनी वेळोवेळी वाचनालयास रोख आर्थिक मदत व ग्रंथसंपदा भेट दिलेली आहे.प्रामुख्याने या पुस्तकांचा संच बाल विभागासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मत कार्यवाह कवडे सर यांनी व्यक्त केली.सर्वांचे स्वागत ज्येष्ठ संचालक जयंत केळकर यांनी केले तर जे बी चौगुले सर यांनी आभार मानले.



