महाराष्ट्र

कोल्हापूरातील शहाजी लॉ. कॉलेज येथे ज्येष्ठ नागरिक चर्चासत्र, गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात

 

 

कोल्हापूरः अनिल पाटील

संस्कारातूनच संस्कृतीचे जतन होते. बाह्य रंगा पेक्षा अंतरंगात प्रत्येकाने डोकावून पहावे.फॅशनचे व्यसनी होवू नका ते घातकी ठरतं. प्रत्येक गोष्टीत आनंद लपलेला आहे त्याचा शोध घेऊन त्याचा ज्येष्ठांनी मनमुराद आनंद लुटावा असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते,हास्य सम्राट संभाजी यादव यांनी केले.
ते शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर येथे जिल्हा ज्येष्ठ नागरिक चर्चासत्र व विविध गुणदर्शन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रादेशिक विभाग कोल्हापूरचे अध्यक्ष दिलीप पेटकर होते.
यादव पुढे म्हणाले म्हातारपणात वृद्धाश्रमाचा रस्ता नको असेल तर जिवंतपणी मुलाला पुंजी देऊ नका. उर्वरित आयुष्य सुखा समाधानच जगायचे असेल तर आरोग्य,आहार व निद्रा वेळेवर घ्या. औषधांच्या गोळी पेक्षा मित्राच्या टोळीत रहा.म्हातारपण सुखकर होईल असा हास्य विनोदातून मार्मीक पणे ज्येष्ठांना सल्ला दिला.
दीप प्रज्वलन शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य प्रवीण पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.स्वागत व प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांनी केले .प्रस्ताविकात त्यानी ज्येष्ठ नागरिका
साठी समाज कल्याण विभाग राबवत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती देत जिल्ह्यातील समाज कल्याण विभाग ज्येष्ठा साठी सर्वतोपरी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगीतले.
सचिव श्रीकांत आडीवरेकर यानी कोल्हापूर फेस्कॉम विभाग ज्येष्ठा साठी राबवत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती देत समाज कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र मिळावे तसेच एकाकी वंचित जीवन जगणाऱ्या, दुर्लक्षित वृद्धांसाठी वानप्रस्थाश्रमाची स्थापना करावी. त्याचप्रमाणे तालुका स्तरावर मार्गदर्शनपर कार्यशाळा व्हाव्यात अशी यावेळी मागणी केली.
जिल्हा प्रादेशिक फेस्कॉम अध्यक्ष दिलीप पेटकर यांनी समाज कल्याण विभाग ज्येष्ठा साठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले व प्रादेशिक विभाग सक्षमपणे ज्येष्ठांसाठी कार्य करत असल्याचे सांगितले.
यावेळी ज्येष्ठांनी साजरी केलेली विविध दर्दभरी गीते ,पोवाडे,लोकगीते व ढोलकीच्या तालावर लावणी सादरी करणाने, वय व देहभान विसरून स्टेजवर ज्येष्ठ नागरिक बंधू-भगिनीने सैराटच्या गीतावर ठेका धरत मनमुराद आनंद लुटला.


कार्यक्रमास डॉक्टर मानसिंग जगताप, ॲड.डॉ.भाग्यश्री कुलकर्णी,डी.एस.घोलराखे,संभाजी थोरात,ज्येष्ठ पत्रकार एन.एस. पाटील, माधव भोसले,अमोल खोत नसरीन मुल्ला, के. बी. गुरव, शांताराम पाटील,(बापू )मेजर पोपटराव कांबळे, डॉ.विमल स्वामी,सुशीला ओडियार मंगल पाटील, प्रा.विभा शहा.आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुका समन्वय सुरेखा डवर यांनी मानले.
फोटो ओळी:

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!