गळीत हंगामाचा दर जाहीर झाल्याशिवाय ऊस वाहतूकधारांनी ऊसतोड घेऊ नये : संदीप राजोबा

म्हैसाळ :
चालू गळीत हंगामातील ऊसाचा प्रतिटन दर जाहीर झाल्याशिवाय व गत वर्षातील रूपये चारशे चा दुसरा हप्ता दिल्याशिवाय ऊस उत्पादक शेतक-यांनी व ऊस वाहतूकदारांनी ऊसतोड घेऊ नये असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदिप राजोबा यांनी म्हैसाळ येथे आयोजित ऊस वाहतूकदारांच्या बैठकीत बोलताना केले.
यावेळी विठ्ठल पाटील (अर्जुनवाड),सुकानू समिती चे संदिप मगदूम,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे म्हैसाळ शाखेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील,पिरगोंडा पाटील, सुधाकर पाटील,नरगोंडा पाटील, ऊस वाहतूक दार दिग्विजय जाधव, अमोल काळे, योगेश घोरपडे,संदिप घोरपडे,दिपक घोरपडे,राजू माळी,बाबर प्रमुख उपस्थित होते. यावेळी स्वागत व प्रास्ताविक मुबारक सौदागर यांनी केले
यावेळी बोलताना संदिप राजोबा म्हणाले “यावर्षी ऊसाची तीव्र टंचाई असून सगळेच कारखाने जेमतेम दीड-दोन महिने चालतील.यामुळे ऊसाला सोन्याच्या भाव मिळणार असून शेतकर्यांनी लगेच कुणाचे तरी ऐकून ऊसतोड घेऊ नये व वाहतूकदारांनी ही घाई करु नये.चालू हंगामातील ऊसाला योग्य दर मिळण्यासाठी व गत वर्षातील ४०० रुपयांचा दुसरा मिळवण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी जन आक्रोश पदयात्रा काढली आहे.सुमारे ३७ कारखान्याकडे १२००कोटी रूपये गत वर्षीच्या गाळापातील शिल्लक असून ते आपल्या हक्काचे आहेत.ते मिळवण्यासाठी हे व्यापक आंदोलन उभारले आहे.येत्या ७नोव्हेंबर रोजी या पदयात्रेची सांगता जयसिंगपूर येथे भव्य अशा ऊस परिषदेने होणार आहे.या परिषदेत अंतिम ऊस दराचा ठराव केला जाणार असून.यासाठी या परिषदेला व आक्रोश पदयात्रेत ही शेतकऱ्यांनी व ऊस वाहतूकदारांनी ही सहभागी व्हावे असे आवाहन ही राजोबा यांनी केले.
संघटना ही केवळ शेतकऱ्यांचीच नाही तर ऊस वाहतूकदारांची ही आहे. वाहतूक दार हे शेतकरीच आहेत.त्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये यासाठी संघटना कार्यरत आहे.अनेक मुकादम व ऊसटोळ्यानी वाहतूक दारांना कोट्यवधी रूपयांची फसवणूक केली आहे.यासाठी संघटनेने मुकादमाविरूध्द केसीस घालून ऊसवाहतुकदारांना त्यांच्या रकमा मिळवून दिल्या आहेत.यापुढे अशी फसवणूक होऊ नये यासाठी संघटनेचे सभासद व्हावा व सुरक्षित राहा.असे शेवटी राजोबा यांनी आवाहन केले.
यावेळी ऊपस्थित सर्व वाहतूक दारांनी उसाचा अंतिम दर जाहीर झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत ऊसतोड घेणार नसून संघटनेच्या या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.