धम्मभूमी” वर्धापनदिन नियोजन बैठकीत उद्योगपती सी आर सांगलीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन

सांगली :- अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित “धम्मभूमी” गुगवाड चा लोकार्पण सोहळा वर्धापन दिन १२ नोव्हेंबर २०२३ रोजी “धम्मभूमी” गुगवाड ( ता. जत) येथे साजरा करण्यात येणार आहे.या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी प्रमुख उपासकांची बैठक मा.उद्योगपती,महाउपासक सी.आर. सांगलीकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित “धम्मभूमी” गुगवाड येथे गतवर्षी 12 नोव्हेंबर २०२२ रोजी “धम्मभूमी” बुद्ध विहारचे लोकार्पण करण्यात आले होते त्यावेळी प्रत्येक वर्षी 12 नोव्हेंबर रोजी “धम्मभूमी” येथे धम्मसेवक,उपासक यांच्या माध्यमातून धम्माचे विविध उपक्रम,कार्यक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्याबाबतची विविध कार्यक्रम राबविण्याची रूपरेषा ठरवणारी नियोजन समितीची बैठक रविवारी सी.आर.सांगलीकर फौंडेशन,सांगली येथे पार पडली.
बैठकीस सांगली,मिरजेसह तालुक्यातील ग्रामीण भागातील तसेच इस्लामपूर,विटा,देशिंग,कोल्हापूर,जय शिंगपूर,तमदलगे आदी भागातील उपासकांनी हजेरी लावली होती.
१२ नोव्हेंबरला “धम्मभूमी” येथे कोणते कार्यक्रम आयोजित करावे, त्यांचं नियोजन कसं करावं याबाबत उपस्थित उपासकांना मनोगते व्यक्त करण्यास सांगितले.
सुरवातीस सलगरचे अनिल कांबळे व लिंगनूरचे कुमार बनसोडे यांनी कार्यक्रमानिमित्त आपण देत असलेल्या भोजनाची नसाडी होवू नये,भोजन हे साधेच असावे,पार्किंग व्यवस्था जवळ असावी असे मत व्यक्त केले.नांदेड येथील गुरुद्वारामधिल शिस्तबध्द भोजन व्यवस्थेबाबत अनिल यांनी अनुभव कथन केला, आणि १२ नोव्हेंबर चा मुख्य सोहळा हा धम्मदेसनेचा असतो,तो उपस्थित उपासकांनी ऐकलाच पाहिजे अशी अपेक्षा कुमार यांनी व्यक्त केली. माधवनगरचे दिपक कांबळे यांनी त्यांच्या एसटी महामंडळातील अनुभवानुसार वाहतूक व्यवस्था सक्षम करुन गोंधळ टाळावा असं सुचवले. धोंडीराम बनसोडे (गुरुजी) यांनी स्वयंसेवकां मार्फत भोजन दानाची व्यवस्था करावी असे मत व्यक्त केले. दीपस्तंभ विहारचे सुरेश माने यांनी दर १२ नोव्हेंबरला धम्म परिषद घ्यावी, तसेच आपण जे कार्यक्रम घेऊ त्याची माहिती सर्वांपर्यंत गेली पाहिजे याची खबरदारी घ्यावी आणि सदर कार्यक्रमाला सर्व उपासकांनी स्वखर्चाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे मुद्दे मांडले. विट्याचे संतोष तायडे यांनी सांगितले की सर्वांनी प्रॅक्टिकल कामं करावीत,आपण आपल्या गावातून किती स्वयंसेवक आणनार यांची संख्या सांगावी, पुढील कार्यक्रमाची माहिती याच कार्यक्रमात जाहिरात पत्रक वाटून करवी असं सुचवलं.आयु.धम्मकिर्ती,प्रा.बाळासाहे ब कर्पे,आयु.गुपचे,सुनील पाटील यांनी ही मनोगते व्यक्त केले.
शेवटी मा.उद्योपती,महाउपासक सी.आर.सांगलीकर साहेबांनी सर्व उपासकांनी सुचवलेल्या सुचनांचे स्वागत करत त्यावर योग्य ते उपाय करण्याचे आश्वासन दिले.मा. सांगलीकर साहेब म्हणाले “धम्मभूमी” येथे येणाऱ्या खूप उपासकांनी इच्छा व्यक्त केली आहे की सेवा,धम्मदान, भोजन देण्या विषयी त्याच पार्श्व भूमीवर ज्यांना कुणाला स्वेच्छेने भोजन दान द्यायचं असेल तर त्यांना विनामूल्य स्टाॅलसाठी जागा उपलब्ध करून देऊ.तसेच “धम्मभूमी” विषयी बोलताना म्हणाले की “धम्मभूमी” हे भविष्यात बौद्धांसाठी पर्यटन स्थळ बनेल.”धम्मभूमी” येथे आल्यानंतर उपासकांनी धम्म घेऊन गेलं पाहिजे.
बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला ”बुध्द आणि धम्म’ सांभाळला तरच आपण सुधारणार आहोत.विरोधक एक वेळ संविधान बदलू शकतील परंतु ‘बुध्द आणि धम्म’ कोणीही बदलू शकणार नाहीत.तसेच धम्मभूमी किंवा फौंडेशनच्या कार्यक्रमाला येत असताना प्रत्येकाने आपल्या घरातील महिलांना घेऊन यावे महिलांच्यात बदल झाला की संपूर्ण कुटुंब बदलायला वेळ लागनार नाही.तसेच येत्या जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये “धम्मभूमी” परिसरात तथागत गौतम बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांचे पुतळे स्थापित करण्यात येणार आहेत त्यावेळी भव्य दिव्य असा कार्यक्रम घेण्याचा मानस व्यक्त केला.
सुत्रसंचालन विश्वास मागाडे यांनी केले. बैठक यशस्वी करण्यासाठी फौंडेशनचे महेश शिवशरण,अविनाश जाधव,रविंद्र खांडेकर,धम्मप्रचारक प्रमोद कांबळे,विनोद गाडे, सचिन इनामदार यांनी परिश्रम घेतले.