पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचा सांगली जिल्हा दौरा

सांगली : राज्याचे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या गुरूवार, दि. 1 ऑगस्ट 2024 रोजीच्या सांगली जिल्हा दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरूवार, दि. 1 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता दास बंगला निवासस्थान विश्रामबाग सांगली येथून एस.टी.स्टँड चौक मिरजकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त पुतळ्यास अभिवादन, स्थळ – एस.टी.स्टँड चौक मिरज. सकाळी 9.45 वाजता एस.टी.स्टँड चौक मिरज येथून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक वाटेगाव ता. वाळवा कडे प्रयाण. सकाळी 11 वाजता लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती निमित्त कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक वाटेगाव. दुपारी 1 वाजता वाटेगाव येथून दास बंगला निवासस्थान विश्रामबाग, सांगलीकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता राखीव. दुपारी 3.30 वाजता गेस्ट हाऊस मिरजकडे प्रयाण. दुपारी 4 वाजता गेस्ट हाऊस मिरज येथे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जलजीवन मिशन संदर्भात बैठक. सोयीनुसार दास बंगला निवासस्थान विश्रामबाग सांगलीकडे प्रयाण.