उद्योगपती सी.आर. सांगलीकर यांच्याकडून पूरग्रस्त गावांना भेटी ; लोकांना दिलासा
मिरज कृष्णा घाट, ढवळी, निलजी, बामणी या गावांना भेट : लोकांमध्ये समाधान

मिरज : उद्योगपती सी.आर. सांगलीकर यांनी पूरग्रस्त गावांची पाहणी करून लोकांना दिलासा दिला.
कृष्णा घाट, ढवळी, निलजी, बामणी या पूरग्रस्त गावांना भेट दिली. पूरस्थितीची पाहणी करून, नागरिकांची आस्थेने विचारपूस केली आणि मदतीचे आश्वासन दिले. ढवळी गावातील ढेपनवाडी वस्तीला भेट देताना, पूरग्रस्त नागरिकांची अडीअडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना धीर दिला.
यावेळी ढवळी गावातील पूरस्थितीबाबत तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे – धुमाळ यांच्याशी चर्चा केली. तहसीलदारांनी सांगितले की मिरज तालुक्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी प्रशासन जवळच्या जि.प. शाळा वड्डी, विजयनगर, म्हैसाळ येथे सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे. कोणीही घाबरून जाऊ नये असे आश्वासन त्यांनी दिले.
सरपंच आकाश गौराजे यांनीही ढवळी ग्रामस्थांना स्थलांतरित करून त्यांच्या राहण्याची सोय ग्रामपंचायतच्या सहकार्याने करण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी आण्णाप्पा पिड्डे, श्रीरंग पाटील, सामाजिक कार्यकर्ते संदीप आकिवाटे, महादेव देवकारे, महादेव कांबळे, दुर्योधन कांबळे, पतंग कांबळे, नंदु बन्ने, सी.आर. सांगलीकर फौंडेशनचे पदाधिकारीसह अन्य मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.