भिलवडी येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

दर्पण न्यूज भिलवडी -:
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सुरुवात बुधवार दि.७ मे २०२५ रोजी भिलवडी येथे झाली असून, याअंतर्गत विविध आध्यात्मिक व भक्तिमय कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याची सांगता
मंगळवार दिनांक १३ मे रोजी होणार आहे.भिलवडी येथील श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे हे अखंडितपणे १६ वे वर्ष आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिलवडी येथील ग्रामस्थ मोठे योगदान देत असतात.
बुधवार दिनांक ७ मे रोजी सकाळी उद्योजक गिरीश चितळे, भिलवडी गावच्या सरपंच सौ शबाना हारुण रशिद मुल्ला,राजेंद्र सावंत,चंद्रकांत पाटील, शहाजी गुरव,बी.डी. पाटील , साहित्यिक सुभाष कवडे,सचिन महिंद पाटील, सेकंडरी स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज भिलवडीचे मुख्याध्यापक संजय मोरे,
मोहन पाटील, रशिद मुल्ला, विजय पाटील
बाळासो मोरे,ऐनुद्दीन उर्फ चया जमादार,
एम आर पाटील, बाळासो महिंद, किशोर महिंद पाटील, राजेंद्र तेली,परशुराम देसाई, भिलवडी ग्रामपंचायतचे सदस्य यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवर व्यक्तींच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर श्रीफळ वाढवून पारायण सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.व्यासपीठ चालक म्हणून ह. भ. प.श्री विश्वास पाटील,रिळे शिराळा हे होते.
हभप सौ व श्री शेखर आंबी यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले तर व्यासपीठ पूजन हभप अनिकेत पाटील,
यांच्या हस्ते झाले.
वीणा पूजन सौ व श्री शंकर सावंत, ध्वज पूजन सौ व श्री सुरेश मदने
यांनी केले.तसेच मूर्ती पूजन हभप सौ व श्री प्रकाश नावडे यांनी
तर कलश पूजन सौ व श्री महेश शिंदे
यांनी केले. तसेच होम पूजन भिलवडी गावचे माजी उपसरपंच बाळासो मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
मोठ्या भक्तिमय वातावरणात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सुरुवात झाली.या पारायण सोहळ्या अंतर्गत दररोज पहाटे चार ते सहा काकड आरती, सकाळी ७.३० ते ११.३० ज्ञानेश्वरी वाचन, दुपारी १२ ते २ संत पंगत, दुपारी २.३० ते ४.३० भजन, सायंकाळी पाच ते सहा प्रवचन, सायंकाळी ६ ते ७.३० हरिपाठ, ७.३० ते ९ संत पंगत व रात्री ९ ते ११ किर्तन असा कार्यक्रम होणार आहे. या अंतर्गत विविध नावाजलेली भजनी मंडळे, सुप्रसिद्ध प्रवचनकार व कीर्तनकार यांचे कार्यक्रम होणार आहेत.सोमवार दिनांक १२ मे रोजी दुपारी २ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भव्य दिंडी सोहळा संपन्न होणार आहे तर मंगळवार दिनांक १३ मे रोजी सकाळी १० ते १२ ह. भ. प. सर्जेराव शिंदे यांचे काल्याचे किर्तन तर रात्री ८ ते १०वा. जय भारत सोंगी भजनी मंडळ रांगोळी यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. वरील सर्वच कार्यक्रमांसाठी
भिलवडी ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांचे मोठे सहकार्य लाभले आहे.
अशी माहिती श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आयोजकांनी दिली आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन घनश्याम रेळेकर यांनी केले.