बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा सांगली जिल्हा दौरा

सांगली : बिहार राज्याचे मा. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे दिनांक ३ डिसेंबर 2024 रोजी सांगली जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार, दि. 3 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता एमआयडीसी मैदान कवलापूर, ता. मिरज येथे आगमन व शासकीय विश्रामगृह मिरजकडे प्रयाण व मुक्काम.
बुधवार, दि. 4 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 8.40 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून सांगली शिक्षण संस्थेच्या सिटी हायस्कूलकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता सिटी हायस्कूल (गावभाग) येथे आगमन. सकाळी 9.45 वाजता सिटी हायस्कूल गावभाग सांगली येथून सांगली शिक्षण संस्थेच्या, मालू हायस्कूल (शिवाजी नगर), कडे प्रयाण. सकाळी 10 ते 11.55 वाजेपर्यंत सांगली शिक्षण संस्थेच्या स्थापनेच्या 111 व्या वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 12.30 वाजता सांगली शिक्षण संस्था येथून एमआयडीसी मैदान कवलापूर कडे प्रयाण. दुपारी 12.50 वाजता एमआयडीसी मैदान कवलापूर हेलिपॅड येथे आगमन व दुपारी 1 वाजता हेलिकॉप्टरने गोवा कडे प्रयाण.