गोकुळचा दूध खरेदी दर जादा व सेवा – सुविधा अधिक : कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांची माहिती
कोल्हापूर ः अनिल पाटील
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाशी सलग्न म्हैस दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस दूध खरेदी दरामध्ये वाढ केलेली आहे. तरी दि.०१/१०/२०२३ इ.रोजी पासून म्हैस दूध ५.५ फॅट ते ६.४ फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर रुपये १ ने दूध खरेदी दरात वाढ केली आहे. तसेच ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिच्या पुढील दुधास प्रतिलिटर १ रुपये ५० पैसे दूध खरेदी दरामध्ये वाढ केली आहे.
म्हैस दूध खरेदी दर वस्तुस्थिती
म्हैस दूध खरेदी दराबाबत दूध उत्पादकांच्या मध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. त्या बाबतची वस्तूस्थिती अशी आहे कि संघामार्फत केलेली म्हैस दूध खरेदी दरवाढ १ रुपये ५० पैसे व वार्षिक म्हैस दूध दर फरक २ रुपये २५ पैसे असे एकूण ३ रुपये ७५ पैसे दर दूध उत्पादकांना मिळणार आहेत. इतर दूध संघाच्या तुलनेत गोकुळ दूध संघाचा हा दर जादाच असून गोकुळने केलेली दरवाढ हि सरळ पद्धतीने केली असून त्यामध्ये कोणत्याही नियम व अटी लावण्यात आलेल्या नाहीत. तसेच ‘दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळ दूध संघाचा मुख्य कणा आहे. दूध उत्पादन वाढीसाठी विविध योजना, संघाने दूध उत्पादकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. गोकुळ दूध संघ हा सदैव् दूध उत्पादकांच्या पाठीशी आहे. सध्याच्या स्पर्धात्मकबाजारपेठेत काही खासगी संस्था दूध उत्पादकांना जादा दराचे आकडेवारी सांगत आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र गोकुळ दूधसंघांचा दूध खरेदी दर हा नेहमीच इतरांच्या तुलनेत जादा आहे. यामुळे दूध उत्पादकांची गोकुळला साथ आणि गोकुळचा दूध उत्पादकांवर विश्वास हे सूत्र कायम राहील.
दूध विक्री दर बाबत
सध्या संघाने दि. ०१/१०/२०२३ इ.रोजी म्हैस दूध खरेदी दरा मध्ये वाढ केली आहे. सध्या गोकुळ कडून दूध विक्री दरात कोणतीही दरवाढ केलेली नाही. गोकुळने नेहमीच दूध उत्पादक व ग्राहकांचे हित जोपासले आहे.
‘दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळ दूध संघाचा मुख्य कणा आहे. दूध उत्पादन वाढीसाठी विविध योजना, संघाने दूधउत्पादकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. गोकुळ दूध संघ हा सदैव् दूध उत्पादकांच्या व ग्राहकांच्या पाठीशी आहे. अशी माहिती संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी दिली.