महाराष्ट्र
मिरज येथे राष्ट्रपिता म.गांधींना उद्योगपती सी आर सांगलीकर साहेब यांनी केले अभिवादन

मिरज प्रतिनिधी :- अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती आहे.गांधी जयंतीनिमित्त उद्योगपती मा.सी.आर. सांगलीकरसाहेब यांनी मिरज येथील म.गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी काॅंग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष संगाप्पांन्ना पाटोळे, काॅंग्रेसचे आर.आर पाटील,मालगाव मा.ग्रा.प.सदस्य रविंद्र क्षिरसागर,सामाजिक कार्यकर्ते रफीक मुल्ला,बैदुल जमादार, मिरज शहर ईदगा कमिटी अध्यक्ष महेबुब अली मणेर, जनसुराज्य पक्षाचे जमील बागवान, आधार फौंडेशनचे बशीर बागवान,अल्लआबक्ष काजी,राष्ट्रवादी काँग्रेसचे गंगाधर तोडकर,जेष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब मोमीन,गोल्डन भांडी व्यापारी सिकंदर बाणदर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते