महाराष्ट्र
भिलवडी येथे दांडक मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद : सर्व जातीधर्मचा सहभाग
महिलांचा सहभाग : रस्त्यावर दांडक आपटून निषेध

भिलवडी : जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथील मराठा समाजातील काही लोकांना लाठीमार झाला. याच्या निषेधार्थ सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे दांडक मोर्चा काढण्यात आला, यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये सर्व जातीधर्मातील लोकांचा सहभाग होता. अंत्यत शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा चे नियोजन केले होते.
संबंधित लोकांवर कडक कारवाई करावी, याबाबतचे निवेदन ग्रामपंचायतीच्या वतीने भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांच्या कडे देण्यात आले.
या मोर्चामध्ये सरपंच, उपसरपंच, सर्व पक्षांचे पदाधिकारी, विविध संघटनेचे पदाधिकारी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोर्चास भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.