भाळवणी येथे चिंचणी अंबक येथील युवकाची नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या ; .विटा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

विटा ( शिराज भैय्या शिकलगार) :-
सांगली जिल्हा. खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील एका शेतातील आंब्याच्या झाडाला युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यासंदर्भात दूरध्वनीवरून पोलीस पाटील यांनी विटा पोलीस ठाण्याला माहिती दिल्यानंतर विटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतले सदर घटणास्थाळी जाऊन या घटनेचा पंचनामा विटा पोलिसांनी करत सदर त्या युवकांचा नातेवाईकांचा शोध घेतल्यानंतर त्या युवकाचे नाव सुरज भास्कर पवार वय वर्ष 35 राहणार चिंचणी आंबक असे समजले . सदर सुरज याचे मानसिक संतुलनाचा त्यास वैयक्तिक त्रास झाल्याने तो वारंवार कसाबसा करत होता त्यानंतर घरातील नातेवाईकांनी त्याला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याला थोडेफार बरे वाटू लागले. म्हणून त्याला थोडे दिवस भाळवणी येथील त्याच्या मामाकडे विश्रांतीसाठी पाठवले. मात्र त्याने दुसऱ्या दिवशी तिथे कोणालाही न सांगता व घरातील ही नातेवाईकांना या संदर्भात कोणतेही कल्पना न देता तो घरातून निघून गेला. व येथील एका उसाच्या शेती कडेला असणाऱ्या आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. तो सदर हा युवक वारंवार आजारी असल्याने त्याचे मानसिक संतुलन हे थोडे त्रासदायक ठरल्याचे समजले सदर त्याचे मोठे बंधू सदर संदीप पवार व त्याची मामा यांनी या संदर्भात विटा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या घटनेची नोंद करत. घटनास्थळी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस सह उपनिरीक्षक पूजा महाजन यांनी पाहणी केली. सदर यासंदर्भात विटा पोलिसांनी पंचनामा करा मयत सुरज पवार याचा मृतदेह विटा येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम साठी हलवण्यात आले . मात्र सुरज पवार यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास विटा पोलीस करीत आहेत.