महाराष्ट्र

अखेर रामानंदनगर च्या नागरिकांनी केले श्रमदान : रेल्वे गेट जवळील रस्त्यावरील “तो” खड्डा मुजवला

 

पलूस : किर्लोस्करवाडी रेल्वे गेट क्रमांक 112 जवळ पूर्वेकडे रस्त्याच्या खुदाई करून रेल्वे कॉटर्स येथील परिसरामध्ये साठलेल्या पाण्याचा निचरा व्हावा म्हणून रस्त्याची कामाची खुदाई करण्यात आली होती. तिथे पाईप टाकून साठलेले पाणी रेल्वे कॉटर्स परिसरामध्ये साठलेले पाणी पाईप टाकून काढण्यात आले याकरिता रेल्वे गेट जवळ रस्त्यावर  जेसीबीने रस्ता उकरण्यात आला होता.  पाईप टाकल्यानंतर व्यवस्थितपणे भर टाकून तो मुजवण्यात आला नाही. त्यामुळे  येजा करणाऱ्या नागरिकांना, वाहनधारकांना दोन दिवस खूप त्रास सहन करावा लागला. याची माहिती रेल्वे प्रशासनाला फोनवरून देण्यात आली होती त्यांनी दोन दिवसात काँक्रीट करून रस्ता सुरळीतपणे करतो असे सांगितले होते. परंतु अनेक अपघात होत असल्याने सदर रेल्वेचे अभियंता सातारकर आणि आरपीएफ चे पोलीस उपनिरीक्षक बाजीराव कडाले यांच्या कानावर दूरध्वनीवरून टाकल्यानंतर त्यांच्या संमतीने येथील नागरिक सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे आणि माजी सरपंच जयसिंग नावडकर यांनी गेटमंजवळील असणारे खोरे आणि पाट्या घेऊनच स्वतः कडी भरून खड्डा मुजवण्यास सुरुवात केली यावेळी बापू वाडी येथील राहणारे लक्ष्मण चव्हाण, साधक रजा मिर्झा, संतोष फडणीस? संतोष कदम, धीरज मदने यांनी ही या श्रमदानामध्ये भाग घेतला आणि खोरेपाट्या घेऊन तिथे असणारी खडी संबंधित खड्ड्यामध्ये टाकून तो खड्डा मुजविण्यात आला. त्यामुळे येजा करणाऱ्या वाहनांना सुलभता निर्माण झाली .परिसरामध्ये श्रमदान करणाऱ्या या नागरिकांचे विशेष कौतुक होत आहे. लवकरात लवकर रेल्वेने यावर सांगितल्याप्रमाणे नोकरी काँक्रिटीकरण करावे आणि पाण्याचा निचरा करण्याकरिता आणखी शंभर मीटर पाईपलाईनने हे पाणी पुढे काढण्यात यावे करावे .अशी मागणी यावेळी माजी सरपंच जयसिंग नावडकर यांनी केली. यावेळी किर्लोस्कर कारखान्यातून येणारे पाण्याचेही व्यवस्थित विल्हेवाट करण्यात यावी अशीही नागरिकांनी मागणी केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!