इस्लामपूर येथे बेडग येथील आंदोलनकर्त्यांचे सी.आर.सांगलीकर फौंडेशन व अथर्व चंद्रकांत सांगलीकर चारिटेबल ट्रस्ट संचलित “धम्मभूमी” यांच्यावतीने अभिनंदन

इस्लामपूर ( सचिन इनामदार) :- बेडग येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान पाडल्याच्या निषेधार्थ चालू असलेले आंदोलन यशस्वी केल्याबद्दल सी.आर.सांगलीकर फौंडेशन व अथर्व चंद्रकांत सांगलीकर चारिटेबल ट्रस्ट संचलित “धम्मभूमी” यांच्यावतीने इस्लामपूर येथे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी अॕड.भारत शिंदे,सचिन इनामदार, पद्माकर कांबळे, रविंद्र खांडेकर,बबलु ढोबळे यांनी आंदोलनकर्त्ये व त्यांचे नेते डॉ.महेश कांबळे, सचिन कांबळे, तुषार खांडेकर, स्वप्निल खांडेकर,उमेश धेंडे, स्वप्निल बनसोडे,कविश कांबळे, सागर आवळे उपस्थित होते.
यावेळी इतरही मान्यवरांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
इस्लामपूर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संजय बनसोडे,आंदोलनाचे नेते सचिन कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.आंदोलनाचे नेते डॉ. महेश कांबळे यांनी आंदोलनास ज्या ज्या समाजात बांधवांनी मदत केली, पाठींबा दिला, लढण्यासाठी बळ दिले अशा सर्वांचे त्यांनी मनापासून आभार मानले आणि आपल्या समाजाने असेच एकत्र राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.तसेच सर्व तरुण सहकार्यांना आंदोलन यशस्वी झाल्यानंतर जल्लोष न करता शांतता पाळावी,आक्रमक कमेंट करू नये, वादग्रस्त स्टेटस ठेऊ नये असे आवाहन केले.
आभार सभेनंतर इस्लामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आंदोलन कर्ते आपल्या बेडग गावी येण्यासाठी निघाले.सांगली, मिरजेतील ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.दरम्यान सांगली, कुपवाड,मिरज येथील बौद्ध बांधवांनी आंदोलकांचे ठिक ठिकाणी जोरदार स्वागत केले. आंदोलनातील नेत्यांनी आंदोलकांना रात्री उशिरा ११वा. च्या दरम्यान बेडग येथे त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवले.