महाराष्ट्र

कोल्हापूरातील मूर्तिकार आणि नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे : आमदार ऋतुराज पाटील यांचे आवाहन

 

 

कोल्हापूरःअनिल पाटील

पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्शभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांनी शाहूपुरीतील कुंभार गल्लीमध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी गणेश मूर्तिकार, भागातील नागरिक यांना वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी महानगरपालिका अधिकाऱ्याना सुरक्षा उपायोजनांबाबत सुचना त्यांनी दिल्या.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरु असणाऱ्या जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून धोका पातळीकडे वाटचाल सुरु आहे. २०१९ व २०२१ मध्ये आलेल्या पुराचा मोठा फटका शाहूपुरी आणि कुंभार गल्लीला बसला होता. या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरपरिस्थिती पाहता आमदार ऋतुराज पाटील यांनी याठिकाणी पाहणी करून आढावा घेतला. या भागात अनेक गणेशमूर्तीकारांचा व्यवसाय आहे. गणेशमूर्तीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. राधानगरी धरण जवळपास भरत आलायने विसर्ग वाढून पाणी पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नरगरिकांनी दक्षता घेऊन लवकरात लवकर सुरक्षित स्थाली स्थलांतरित व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी नागरिकांशी संवाद साधत आमदार पाटील यांनी समस्या जाणून घेतल्या. ज्या भागातून कुंभार गल्लीत पाणी शिरते त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधणे, त्याचबरोबर स्वच्छता व स्ट्रीट लाईट संबंधीत सुविधांची तात्काळ अंमलबाजवणीच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी माजी उपमहापौर प्रकाश नाईकनवरे, माजी नगरसेविका पूजा नाईकनवरे, सामाजिक कार्यकर्ते अमर समर्थक, काँग्रेस शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, गणी आजरेकर, महानगरपालिका सहाय्यक आयुक्त डॉ. विजय पाटील, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत, ड्रेनेज सहाय्य्क अभियंता आर.के. पाटील यांच्यासह अधिकरी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!