वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सांगली -: वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळामार्फत व्याज परतावा योजना, 25 टक्के बीज भांडवल योजना, 1 लाखापर्यंत थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक किरण गिऱ्हे यांनी केले आहे.
या योजनांकरीता सन 2023-2024 या आर्थिक वर्षाचे उदिष्ट प्राप्त झाले आहे. एक लाखापर्यंत थेट कर्ज योजनेत संपूर्ण कर्ज महामंडळाचे राहील, 25 टक्के बीज भांडवल योजनेत 75 टक्के कर्ज बँकेचे व 25 टक्के कर्जासाठी महामंडळाचा सहभाग राहील. व्याज परतावा योजनेत संपूर्ण कर्ज बँकेचे राहील तथापि कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास कमाल 12 टक्केपर्यंतचे व्याज महामंडळ लाभार्थीच्या बँक खात्यावर जमा करेल. थेट कर्ज योजना व 25 टक्के बीज भांडवल योजना ऑफलाईन असून व्याज परतावा योजना ऑनलाईन स्वरुपाची आहे. ऑनलाईन योजनेंतर्गत www.vjnt.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी हा पर्याय निवडून ऑनलाईन अर्ज भरावा, आवश्यक कागदपत्रे पोर्टवर सादर करावीत.
अधिक माहितीसाठी महामंडळाचे सांगली जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जूना बुधगांव रोड, संभाजी नगर, दूरध्वनी क्रं. 0233-2376383 येथे संपर्क करावा तसेच महामंडळाची वेबसाईट www.vjnt.in पाहावी, असे आवाहनही श्री. गिऱ्हे यांनी केले आहे.