कोल्हापूर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय’ कार्यान्वित :पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन

कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे):-कोल्हापूर :- मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी ‘जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय’ या नव्या कार्यालयाचे उद्घाटन रोजी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, सहाय्यक आयुक्त सचिन साळे, विविध दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी, कास्ट संघटनेचे सदस्य, तसेच दिव्यांग शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पालकमंत्री आबिटकर या उपक्रमाचे स्वागत करताना म्हणाले, “दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वयाची गरज होती. हे कार्यालय त्या दृष्टीने मोलाचे काम करेल,” असे सांगून त्यांनी या कार्यालयाच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हे कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ येथे अपंग वित्त विकास महामंडळाच्या जागेत पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आले असून श्रीमती साधना कांबळे यांची या कार्यालयाच्या पहिल्या अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.