भिलवडी येथील इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल, भिलवडीच्या विद्यार्थ्यांची एस.एस.सी.बोर्ड परीक्षेत उत्तुंग भरारी
भक्ति रेठरेकर हिने ९९% गुणांनी शाळेत प्रथम ; अनुजा चिंचवडे द्वितीय, नेहा पाटील तृतीय

दर्पण न्यूज भिलवडी :-: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील एस.एस.सी.बोर्ड परीक्षेत, इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल, भिलवडीची उत्तुंग भरारी घेतली आहे.
मार्च २०२५ मध्ये झालेला एसएससी बोर्डाच्या परीक्षेत *भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल, भिलवडी* या शाळेचा निकाल *सलग ११ व्या वर्षी १००%* लागला आहे.
♦️ *कु.भक्ति भगवंत रेठरेकर हिने ९९% गुण* मिळवून शाळेत *प्रथम क्रमांक* पटकावला
♦️ *कु.अनुजा अरविंद चिंचवडे हिने ९६.४० % गुण* मिळवून *द्वितीय क्रमांक* मिळविला तर ♦️ *कु. नेहा विनोद पाटील ९६.२० % गुण मिळवून* शाळेत *तिसरी* आली.
🔸 *कु.भक्ति रेठरेकर* ला *विज्ञान आणि तंत्रज्ञान* या विषयात *१००/१००* गुण मिळाले.
एकूण २५ विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले होते. यापैकी *१५ विद्यार्थ्यांना*
*९०% पेक्षा जास्त गुण* प्राप्त झाले आहेत. *९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य* मिळवले तर एक विद्यार्थी प्रथम श्रेणी घेऊन उत्तीर्ण झाला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक, शिक्षक, व शिक्षकेतर सेवकांचे संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त , सर्व संचालक, सचिव, विभाग प्रमुख, आजिव सदस्य या सर्वांनी अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.