महाराष्ट्र

पलूस तहसील कार्यालयात शिवजयंती साजरी

तहसीलदार दीप्ती रिठे यांचे हस्ते शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन

 

 

दर्पण न्यूज पलूस प्रतिनिधी – :

पलूस तहसील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी तहसीलदार दीप्ती रिठे म्हणाल्या,  छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्त्रियांचा सन्मान राखला त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांना त्यांनी कडक शासन केले. जयंतीच्या निमित्ताने आम्ही विधायक काम केलेल्या एमकेसीएलच्या विद्यार्थ्यांचा सत्कार . विद्यार्थ्यांनी स्वकर्तृत्वा ने कमवून त्यांच्या आई-वडिलांना स्वतःच्या पैशातून काही वस्तू कपडे दागिने केले आहेत. ही अभिमानाची बाब आहे.त्या वस्तू विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना दिल्या.यावेळी दीप्ती रिठे म्हणाल्या की,छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य सांगण्यासाठी शब्द अपुरे आहेत.त्यांनी स्त्रियांचा सन्मान केला. गड किल्ल्यांची बांधणी चांगली केली. त्यांचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे असे प्रतिपादन तहसीलदार रिठे यांनी केले.यावेळी एमकेसीएलचे ब्राईट कॉम्प्युटर च्या वतीने सोमनाथ शिंदे यांनी पलूस तालुक्यात एमकेसीएलच्या माध्यमातून केलेल्या कामाची माहिती दिली. यावेळी तहसीलदार दीप्ती रिठे, निवासी नायब तहसीलदार डॉ. आसमा मुजावर,पुरवठा निरीक्षण अधिकारी मंजुळा आत्राम,नवोदयचे उपप्राचार्य सदाशिव बोभाटे यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सोमेश्वर जायभाय यांनी केले, नवोदय विद्यालयचे संगीत शिक्षक योगेंद्र देवरस आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्या मध्ये सर्व उपस्थितानी सहभाग नोंदवला . यावेळी तहसील कार्यालयातील महसूल चा सर्व स्टाफ, मंडळ अधिकारी,तलाठी, कोतवाल,एमकेसीएलचे विद्यार्थी त्यांचे पालक पत्रकार उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!