औदुंबर येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन घेण्यासाठी संधी द्यावी ; पुरूषोत्तम जोशी
९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनाचे क्षेत्र औदुंब येथे आयोजित करण्यासाठी समितीकडून जागेची पाहणी

दर्पण न्यूज भिलवडी ;- औदुंबर येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन घेण्याचे निश्चित करून आम्हाला साहित्याची सेवा करण्याची संधी द्यावी,
साहित्याचा प्रसार ग्रामिण भागात ही वाढेल. साहित्य मंडळाने दिलेली जबाबदारी सार्थ पणे पार पाडून ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी करून दाखवू असे मनोगत सदानंद साहत्य मंडळाचे कार्यवाह पुरूषोत्तम जोशी यांनी व्यक्त केले.
औदुबंर येथे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे क्षेत्र औदुंबर ता.पलूस येथे आयोजित करण्यासाठी जागेची पाहणी करणा-या पथकाचे स्वागत प्रसंगी ते बोलत होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पाहणी समितीने सदानंद साहित्य मंडळ, औदुंबर येथे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनाचे क्षेत्र औदुंबर ता.पलूस येथे आयोजित करण्यासाठी जागेची पाहणी केली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे
अध्यक्ष मिलींद जोशी, उपाध्यक्ष गुरैय्या रे स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.मान्यवरांनी औदुंबर येथील दत्त मंदिरात जाऊन दत्तगुरुंचे दर्शन घेतले. कवी सुधांशु यांच्या निवास स्थानास भेट दिली. सदानंद साहित्य मंडळाच्या कार्याचा आढावा घेणारी ५ मिनीटांची ध्वनी चित्रफीत मान्यवरांना दाखविण्यात आली.
यावेळी बोलताना प्रा. मिलींद जोशी म्हणाले की, आम्ही फक्त संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी जागा पाहण्याचे काम करून हा अहवाल अखिल भारतीय साहित्य मंडळाच्या कार्यालयात मांडणार आहे. त्यानंतर मंडळाची बैठक होऊन साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी भरवायचे यावर शिक्कमोर्तब होईल.मोठ्या शहरापेक्षा ग्रामीण भागातील साहित्य रसिकांमध्ये साहित्याविषयी मोठी आवड आहे. औदुंबर येथील सदानंद साहित्य मंडळाने अखिल भारतीय साहित्य संमेलनचे आपल्याकडे व्हावे यासाठी असलेला उत्साह कौतुकास्पद असल्याचे मत कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी व्यक्त केले.
तर माजी मंत्री आमदार डॉ.विश्वजीत कदम, जयंत पाटील, आ. अरुण आण्णा लाड, खा. विशाल पाटील, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आदींसह प्रमुख नेते मंडळी सर्वोतोपरी सहकार्य करून संमेलन यशस्वी करणार असल्याची माहिती संबंधितांच्या प्रतिनिधींनी दिली.
यावेळी श्री दत्त देवस्थानचे अध्यक्ष संतोष पाटील, मंडळाचे अध्यक्ष शहाजी सुर्यवंशी, प्रा. सुभाष कवडे, हणमंत पाटील, उमेश जोशी,प्रा.प्रदीप पाटील, प्रा.संतोष काळे यांच्यासह अन्य मान्यवर व नागरिक उपस्थित होते.