मुंबई येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नवीन कार्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन
राज्यातील दिग्गज नेते मंडळींची उपस्थिती : जनसुराज्य शक्ती पक्षाच्या आगामी कार्ययोजनांसाठी शुभेच्छा

दर्पण न्यूज विधानभवन, मुंबई :- विधानभवन, मुंबई येथे मंगळवार दिनांक 8 रोजी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी राज्यातील दिग्गज नेते मंडळींची उपस्थिती होती.
कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांनी कार्यालयाची पाहणी केली आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या आगामी कार्ययोजनांसाठी शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याला महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकरजी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील,मंत्री अतुल सावे,मंत्री शिवेंद्रराजे भोसले,मंत्री हसन मुश्रीफ,खासदार धैर्यशील माने,
जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार विनयजी कोरे, आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू ),आमदार विश्वजीत कदम,आमदार सुधीर गाडगीळ,जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम,जिल्हा बँकेचे संचालक विजयसिह माने,माजी सभापती सर्जेराव पाटील पेरिडकर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.