लोकनेते जे के (बापू) जाधव यांना राष्ट्रीय स्तरावरील “लोकराजा राजश्री शाहू गौरव” पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर प्रतिनिधी :- दुधोंडी येथील पलूस तालुक्याचे ज्येष्ठ लोकनेते कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक जे के (बापू) जाधव यांना सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना कोल्हापूर येथील अविष्कार फौडेशन चा राष्ट्रीय स्तरावरील “लोकराजा राजश्री शाहू गौरव” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सामाजीक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अविष्कार फौडेशनच्या वतीने लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात कार्य करीत असलेल्या मान्यवरांना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील “लोकराजा राजश्री शाहू गौरव” या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते यावेळी हा कार्यक्रम कोल्हापूर येथे राज्यभरातील ९ मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्कार आणि ७७ मान्यवरांना राज्य पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आसाम येथील गुवाहटीचे समाजसेवक आणि आसामी साहित्यिक पंकज बैश्य हे उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारत असताना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार विजेते यांची मनोगते झाली यामध्ये जे के (बापू) जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर या कार्यक्रमासाठी अध्याक्ष्यस्थानी प्रा. किसनराव कुराडे, तर प्रमुख मान्यवर म्हणून छत्रपती साम्भाजीनागारचे निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील, डॉ एम बी शेख चेअरमन रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभाग, दीपक आर्वे सहायक पोलीस आयुक्त सोलापूर, उद्योगपती संजय भागत, सुनील साळुंखे चित्रपट डायरेक्टर, संजय पवार राष्ट्रीय अध्यक्ष अविष्कार फौडेशन, श्रीमती उज्वला सातपुते अध्यक्षा दक्षिण भारत विभाग, दत्तात्रय सूर्यवंशी महारष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष, रंगराव सूर्यवंशी अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा, जब्बार शिकलगार अध्यक्ष सोलापूर जिल्हा, विलास आंबेकर महासचिव पुणे विभाग, कोल्हापूर नूतन सचिव मिलिंद देसाई, इस्लामपूरचे राहुल सोनवणे, विष्णू रोकडे, तसेच इतर मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते.