महाराष्ट्र

पोलिस शिपाई प्रशिक्षण सत्रासाठी कंत्राटी पदांची भरती  

 

        सांगली : पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येते नवप्रविष्ट पोलीस शिपाई प्रशिक्षण सत्रासाठी धोबी,मोची, शिंपी आणि न्हावी ही चार पदे कंत्राटी स्वरूपात भरण्यात येणार आहेत. निविदा अर्ज 29 मे 2023 अखेर अधीक्षक कार्यालय, पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची यांच्याकडे सुट्टीचा दिवस सोडून कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील. तसेच नियम व अटी प्रशिक्षण कार्यसनांकडे पाहावयास मिळतील. संपूर्ण भरलेला अर्ज / निविदा योग्य त्या कागदपत्रासह (पूर्व अनुभव/आधार कार्ड / पॅन कार्ड ) दिनांक 31 मे 2023 अखेर पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे स्वीकारले जातील.  प्राप्त झालेल्या निविदा छाननीनंतर स्वीकारणे, कोणतेही कारण न दाखवता पूर्णपणे नाकारणेचा अधिकार प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यानी राखून ठेवला आहे. ज्या निविदा मंजूर होईल अशा ठेकेदारांनी (धोबी – 20000/- मोची – 5000/-  शिंपी – 5000/-  व न्हावी – 10000/- ) अनामत रक्कम भरावी लागेल. प्राप्त निविदा दिनांक 1 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची धीरज पाटील यांचे दालनात उघडण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य धीरज पाटील यांनी कळवले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!