आमदार अरुण लाड यांच्या विशेष प्रयत्नांनातून ३ कोटी २४ लाख रुपये विविध विकास कामांचे शुभारंभ, लोकार्पण सोहळा

दर्पण न्यूज भिलवडी:
पुणे पदवीधर आमदार अरुण लाड यांच्या विशेष प्रयत्नांनातून मंजूर विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबंध आहोत असे प्रतिपादन शरद लाड यांनी नागरिकांशी बोलताना केले.वसगडे- माळवाडी रस्त्या दरम्यान पाटील मळा जवळील पुलाचे लोकार्पण रक्कम रुपये १.५ कोटी रुपये, माळवाडी ते भुवनेश्वरवाडी रस्ता करणे निधी १.५ कोटी रुपये, भिलवडी ते सुखवाड़ी (मौटी) रस्त्याचे लोकार्पण रक्कम रुपये १७ लाख, भिलवडी येथील श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर येथे सोयी सुविधा पुरविणे रुपये रक्कम ७ लाख असे एकूण ३ कोटी २४ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे शुभारंभ व लोकार्पण सोहळा क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, माजी जि. प सदस्य सुरेंद्र वाळवेकर,क्रांतीचे संचालक विजय पाटील, संजय पवार, वसगडे गावचे सरपंच श्रेणिक पाटील, माळवाडीच्या सरपंच अश्विनी साळुंखे, संताजी जाधव, धन्यकुमार पाटील,सतीश चौगुले,राजेंद्र रुपटके, राजेंद्र चौगुले, दिलीप मोकाशी,यांच्यासह आदीमान्यवर नागरिक व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.