मुंबई पोर्ट ट्रस्ट कामगारांच्या वतीने प्रतिम भिकाजी जाधव यांचा क्रृतज्ञता सोहळा संपन्न

मुंबई : गुरुवार, दि. २७ एप्रिल २०२३* : मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या सीएमई विभागाच्या ओपीएल, वडाळा खात्यातील मुख्य समयपाल प्रतिम भिकाजी जाधव हे चाळीस वर्षांची निष्कलंक, प्रामाणिकपणे सेवा करून सेवानिवृत्त झाले.या सेवानिवृत्ती कार्यक्रमाला ‘कृतज्ञता सोहळा’ असे स्वरूप देण्यात आले होते. ‘पुस्तक भेट द्या, पुष्पगुच्छ नको!’ या स्वरूपात इतर कोणतीही भेट सन्मानपूर्वक नाकारत संपन्न झाला.
या दर्जेदार कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मा. शरद मेहेत्रे साहेब कनिष्ठ अभियंता, प्रमुख पाहुणे सन्मा.तानाजी गायकवाड साहेब,लेखक आणि कवी,नाट्य कलाकार,वसाहत निरीक्षक हे होते तसेच सुरेख आणि खुमासदार शैलीत सूत्र संचालन सन्मा.हर्षद परुळेकर,विद्यमान संचालक, यांनी केले.सदर प्रसंगी सर्वश्री राजेश दुबे कब्बडी खेळाडू,रमेश कुऱ्हाडे,चळवळीतील सच्चा कार्यकर्ता, राजन फाटक,बुद्धिबळ खेळाडू,भाई नार्वेकर,आकाशवाणी आणि नाट्य कलावंत,जयंत बर्वे,चळवळीतील अभ्यासपूर्ण कार्यकर्ता, संजय जाधव,चित्रकार आणि रांगोळीकार, नागसेन निकम,माध्यम प्रतिनिधी,निवेदक, संदीप शिंदे, कवी आणि नाट्य कलाकार, पंजाबजराव गवई,सच्चा समाज सुधारक,अनिल नगारी,माजी पतपेढी संचालक,संजय तावडे,विद्यमान पतपेढी संचालक,डॉ सुर्यबहादूर डी सिंग,कवी आणि वरिष्ठ बँक अधिकारी,इत्यादींची समयोचित संक्षिप्त भाषणे झाली. आणि या सोहळ्यास येऊ न शकलेले जे.डी. मल्हारी सर, नाट्य मित्र दिलीप वीर याची प्रभावशाली पत्रे वाचली गेली.
सर्वप्रथम प्रास्ताविक करताना हर्षद परुळेकर यांनी प्रतिम जाधव यांच्या चाळीस वर्षांच्या वाटचालीतील टप्पे सांगितले.
सदर प्रसंगी संविधानाच्या प्रास्ताविकेची तसबिर आणि स्मृतिचिन्ह सर्वश्री सुहास बाबर,संतोष गमरे,हर्षद परुळेकर,गणेश भगत सेक्सन कडून देण्यात आले. आणि पतपेढीचे संचालक संजय तावडे, संचालक हर्षद परुळेकर यांनी पटापेढीकडून स्मृतिचिन्ह भेट म्हणून देण्यात आले.
या कृतज्ञता सोहळ्यासमयी सर्व उपस्थितांना स्मृतीशेष प्रा.विजय जामसंडेकर सर यांच्या ‘अभिज्ञान अकादमी’ या संस्थेकडून प्रत्येकाला ‘एक पुस्तक’ सप्रेम भेट म्हणून देण्यात आले.
विशेष म्हणजे उपस्थितांनीही इतर कोणतीही भेट न आणता पुस्तकेच आणली होती.सदर प्रसंगी प्रतिम जाधव यांचा मुलगा गुंजन, मुलगी डॉ प्रांजली, जावई प्रांजल आणि पत्नी प्रेरणा यांची समयोचित छोटेखानी भाषणे झाली. त्यांनी मुंबई बंदरामधील सहकाऱ्यांचे प्रतिम जाधव यांच्या गत तीन वर्षें प्रकृती अस्वस्थतेमुळे सांभाळून घेतले त्यामुळे आभार मानले. प्रतिम जाधव यांनीही सर्वांचे आभार मानून कार्यक्रम सेवानिवृत्ती नसून कृतज्ञता सोहळा आहे म्हणून प्रतिपादन केले. गत 40 वर्षें केलेल्या कामाचा आढावा घेतला. आजोबा(वडिलांचे वडील) जेथे कामाला होते, वडीलही तेथेच नोकरीस होते; तेथे चतुर्थ श्रेणी मध्ये कामावर रुजू झाले. सेल्स टॅक्स मध्ये तृतीय श्रेणी मध्ये नोकरीचा कॉल आला असतांहि वडिलांच्या ‘इथेच तृतीय श्रेणीत प्रमोशन मिळवं’ म्हणून आग्रह धरला. तो पूर्ण केला याचा आनंद आहे. निवृत्तीच्या वेळेस आजोबा(आई चे वडील) जेथे कामाला होते तेथून निवृत्तीचा आंनद आहे. मामा ज्या बंदराच्या पतपेढी मध्ये संचालक होते तिथे मलाही संचालक होता आले हाही योगायोग सांगितला. ज्यावेळी कामावर रुजू होताना मुंबई बंदर विश्वस्त मध्ये जितके कामगार होते त्याच्या 10 टक्के कामगार राहिले आहेत याचेही सूतोवाच करताना चिंता व्यक्त केली. मुंबई बंदराला गोदी म्हणतात आणि गोदीमायचे ऋण तीन पिढीचं आहे ते उतराई होणे शक्य नाही. सरतेशेवटी कामगार बंधू, कर्मचारी, अधिकारी आणि प्रसासनातील सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले. सरतेशेवटी देहदान आणि अवयव दान करणार असल्याचे जाहीर करून मनोगत व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ओपीएल, वडाळा येथील सर्व कामगार सहध्यायी यांनी अथक मेहनत घेतली होती. सर्वश्री सुहास बाबर, कृष्णकांत जाधव,राजू अंकत,हर्षद परुळेकर, सूर्यकांत शिंदे, संतोष गमरे,गणेश भगत,संजय पाटील, राजेश दुबे, राजन फाटक, पार्थसारथी कुलकर्णी, मधूकर करकेरा,अविनाश गुरव, रुपेश शिरसावळे इत्यादींनी विशेष मेहनत घेतली होती.