मन की बात कार्यक्रमाचा शंभरावा एपिसोड साजरा करण्यासाठी मॅंगो एफएम आणि केंद्रीय संचार ब्युरो कोल्हापूर यांच्यातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई :- आज मन की बात चा 100 वा भाग प्रसारीत झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी निवडलेले हे माध्यम 100 व्या भागापर्यंत आपला प्रवास घेऊन आले आहे
या संवादापर्यंत अधिकाधिक लोकांनी पोहचावे म्हणून केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय, कोल्हापूर आणि मॅंगो एफएम कम्युनिटी रेडियो केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मन की बात या कार्यक्रमाच्या शंभराव्या भागासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मॅंगो एफएमच्या स्टुडिओमध्ये मन की बातचा शंभरावा भाग श्रोत्यांनी एकत्र बसून ऐकला. यावेळी मन की बात शंभरावा भाग अशी विशेष सजावट केलेला केक कापण्यात आला.
यावेळी श्रोत्यांनी मन की बात कार्यक्रमाच्या विविध पैलूंविषयी चर्चा केली आणि आपल्याला तो कार्यक्रम का आवडतो. हा कार्यक्रम पाहणे त्यांनी कधी आणि कसे सुरू केले या विषयी आपले अनुभव कथन केले.
मन की बात कार्यक्रमाविषयी मॅंगो एफएम वरून दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मन की बात या कार्यक्रमाचा वापर करून जास्तीत जास्त नागरिकांनी पंतप्रधानांशी संवाद साधावा यासाठी कोल्हापूर शहरात विविध मोक्याच्या ठिकाणी केंद्रीय संचार ब्युरोच्या कोल्हापूर कार्यालयातर्फे काल रात्री फलकदेखील लावण्यात आले आहेत.
यावेळी मॅंगो एफएम कम्युनिटी रेडियो केंद्राचे आशिष कदम, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, प्राध्यापिका कविता गगराणी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.