शाहू स्पोर्ट्स’चा सागरमाळ स्पोर्ट्स संघावर 57 धावांनी विजय : छत्रपती राजाराम चषक टी —20 क्रिकेट स्पर्धा

कोल्हापूरः अनिल पाटील
छत्रपती राजाराम चषक टी-२० स्पर्धेमधील आज पहिला सामना शाहूपुरी जिमखाना मैदानावर सुरू झाला. सागरमाळ स्पोर्ट्स विरुद्ध राजर्षी शाहू स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान हा सामना झाला. सागरमाळ स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारले. शाहू स्पोर्ट्स या संघाने निर्धारित 20 षटकांमध्ये 7 बाद 187 धावा केल्या .त्यामध्ये अनिमेश पाटील याने 76 व सागर कोरे 23 धावा केल्या. सागरमाळ स्पोर्ट्स गोलंदाजी करताना निखिल जैन व अथर्व पवार याने 1 बळी मिळवले. उत्तरादाखल खेळताना सागरमाळ स्पोर्ट्स या संघाने 17 षटकात 10 बाद 130 धावा केल्या. यामध्ये नरेंद्र कदम याने 24 धावा केल्या. शाहू स्पोर्ट्स रितेश नायकवडी याने 4 बळी मिळवले. शाहू स्पोर्ट्स या संघाने हा सामना 57 धावांनी जिंकला. सामनावीर पुरस्कार अनिमेश पाटील याला देण्यात आला.
दुसरा सामना शाहूपुरी जिमखाना मैदानावर सुरू झाला. अण्णा मोगणे सहारा विरुद्ध कागल या दोन संघादरम्यान होता. अण्णा मोगणे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले. अण्णा मोगणे या संघाने निर्धारित 20 षटकांमध्ये 10 बाद 149 धावा केल्या .त्यामध्ये स्वप्नील याने 35 व नील कदम 29 धावा केल्या. कागल असोसिएशन गोलंदाजी करताना कशितिज पाटील व प्रथमेश बाजारी यानी 3 बळी मिळवले. उत्तरादाखल खेळताना कागल असोसिएशन या संघाने 19 षटकात 7 बाद 150 धावा केल्या. यामध्ये रणजित निकम याने 87 धावा केल्या. अण्णा मोगणे या संघाकडून प्रशांत कोरे याने 2 बळी मिळवले. कागल असोसिएशन या संघाने हा सामना 3 गडी राखून जिंकला. सामनावीर पुरस्कार रणजित निकम याला देण्यात आला.