क्राईममहाराष्ट्र
कोल्हापूरात गाई’ने शिंग मारल्याने भाजीविक्रेती महिला गंभीर जखमी

कोल्हापूरः अनिल पाटील
कोल्हापूरातील गंगावेश नजीक असणार्या शाहू उद्यान मार्केटमध्ये गाई’ने शिंग मारल्याने भाजीविक्रेती धाकूबाई राजाराम शिंदे ( वय 65 ) रा. आरळे ता. करवीर या गंभीर जखमी झाल्या.
कोल्हापूरातील शाहू उद्यान मार्केट आहे. या मार्केटमध्ये संगिता संजय जाधव या भाजी विक्रिचा व्यवसाय करतात. आज त्यानां काही काम असल्याने तिने आपली आई धाकूबाई राजाराम शिंदे हिला भाजीविक्रिसाठी पाटविले होते. आज सकाळी 11 वाजण्याच्या सूमारास त्या भाजी विक्री करत असताना भटक्या गाईने त्यांच्या मांङीत शिंग मारले.यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर सी.पी. आर रूग्णालयामध्ये उपचार सूरू आहेत. या घटनेची नोंद सी.पी.आर पोलिस र्चोकीत झाली आहे.