फायटर्स स्पोर्ट्स संघाचा यशराज स्पोर्ट्सवर 62 धावांनी दणदणीत विजय : छत्रपती राजाराम चषक टी— 20/20 क्रिकेट स्पर्धा

कोल्हापूरःअनिल पाटील
छत्रपती राजाराम चषक टी-२० स्पर्धेमधील आज पहिला सामना शास्त्रीनगर मैदानावर सुरू झाला. फायटर्स स्पोर्ट्स विरुद्ध यशराज स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान झाला.. यशराज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फायटर्स या संघाने निर्धारित 20 षटकांमध्ये 6 बाद 174 धावा केल्या .त्यामध्ये असींपिर मुजावर याने 20चेंडूमध्ये 42 धावा केल्या. यशराज संघाकडून गोलंदाजी करताना गौरव मुळे याने 2 बळी मिळवले. उत्तरादाखल खेळताना यशराज स्पोर्ट्स या संघाने 20 षटकात 7 बाद 112 धावा केल्या. यामध्ये केदार वाघपुरकर याने 52 चेंडूत 46 धावा केल्या. फायटर्स संघाकडून फहिम अतनिकर याने 3 बळी मिळवले. फायटर्स स्पोर्ट्स संघाने हा सामना 62 धावांनी जिंकला. सामनावीर पुरस्कार फहिम अतनिकर याला देण्यात आला.
तर दुसरा सामना शाहूपुरी जिमखाना मैदानावर सुरू झाला. पॅकर्स क्रिकेट क्लब विरुद्ध रमेश कदम क्रिकेट अकादमी या दोन संघादरम्यान झाला. पॅकर्स क्रिकेट क्लब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले. पॅकर्स क्रिकेट क्लब या संघाने निर्धारित 20 षटकांमध्ये 8 बाद 153 धावा केल्या .त्यामध्ये वैभव पाटील याने 63 व प्रफुल्ल चव्हाण 21धावा केल्या. रमेश कदम क्रिकेट अकादमी गोलंदाजी करताना देव थोरात याने 3 बळी मिळवले. उत्तरादाखल खेळताना रमेश कदम क्रिकेट अकादमी या संघाने 20 षटकात 9 बाद 136 धावा केल्या. यामध्ये समर्थ दांडगे याने 43 धावा केल्या. पॅकर्स क्रिकेट क्लब सुधीर तोडकर याने 2 बळी मिळवले. पॅकर्स क्रिकेट क्लब संघाने हा सामना 17 धावांनी जिंकला. सामनावीर पुरस्कार वैभव पाटील याला देण्यात आला.