सांगली: छावणीमध्ये दाखल जनावरांना चारा, पाणी, पशुखाद्य देण्यासाठी 30 जून पर्यंत दरपत्रक मागणी

दर्पण न्यूज सांगली : जिल्ह्यात संभाव्य पूरपरिस्थितीत विस्थापित कराव्या लागणाऱ्या जनावरांकरिता तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या छावणीमध्ये दाखल जनावरांना चारा, पाणी व पशुखाद्य उपलब्ध करून देण्यासाठी सेवाभावी संस्था, उत्पादक, पुरवठादार यांच्याकडून 30 जून 2025 पर्यंत दरपत्रके मागविण्यात आली आहेत. बंद लिफाफ्यामध्ये चाऱ्याच्या प्रकारानुसार तालुकानिहाय वाहतुकीसह जागा पोहोच प्रति टन याप्रमाणे दरपत्रके जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सांगली (मुख्यालय-मिरज) यांचे कार्यालय, डॉ. आंबेडकर रोड, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय आवार, मिरज-416410 या कार्यालयास टपालाने अथवा समक्ष सादर करण्याची दक्षता घ्यावी. उशिरा प्राप्त होणाऱ्या दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही, असे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. एम. बी. गवळी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
दरपत्रके जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सांगली (मुख्यालय-मिरज) यांचे कार्यालय डॉ. आंबेडकर रोड, जिल्हा पशुवैद्यकिय सर्वचिकित्सालय आवार, मिरज यांच्या दालनात दिनांक 1 जुलै 2025 रोजी दुपारी 12 वाजता उघडण्यात येतील. अर्जाचा नमुना, अटी व शर्ती sangli.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
अटी व शर्ती पुढीलप्रमाणे – छावणीत दाखल होणाऱ्या मोठ्या व लहान जनावरांना पिण्यासाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. शासन निकषाप्रमाणे छावणीत दाखल झालेल्या प्रति मोठ्या व लहान जनावरास प्रतिदिन वाळलेला किंवा हिरवा चारा व पशुखाद्य खालीलप्रमाणे देण्यात यावे.
अ.क्र. चाऱ्याचा प्रकार मोठी जनावरे लहान जनावरे १) हिरवा चारा (मका, ऊस,उसाचे वाढे) १८ किलोग्रॅम ०९ किलोग्रॅम २) पशुखाद्य (आठवड्यातून ३ दिवस १ दिवसाआड) १ किलोग्रॅम ०.५ किलोग्रॅम किंवा १) वाळलेला चारा (कडबा किंवा कडब्याची कुट्टी,वाळलेला चारा किंवा वाळलेले गवत) ६ किलोग्रॅम ३ किलोग्रॅम २) पशुखाद्य (आठवड्यातून ३ दिवस १ दिवसाआड) १ किलोग्रॅम ०.५ किलोग्रॅम किंवा १) मक्याचा मुरघास ८ किलो ४ किलो
सन २०१९, २०२१ व २०२४ मध्ये सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर आला होता. पुरामध्ये एकूण १०५ गावे बाधित झाली होती. त्यामुळे पूरग्रस्त जनावरांना सुरक्षित ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात विस्थापित करण्यात आले होते. सन २०२५ मध्ये हवामान खात्याने मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्याअनुषंगाने आपत्कालिन सभेतील जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्कालीन समिती, सांगली यांच्याकडील सूचनांनुसार संभाव्य विस्थापित कराव्या लागणाऱ्या जनावरांकरिता चारा, पाणी व पशुखाद्य उपलब्ध करून देण्यासाठी दरपत्रके मागविण्यात आली आहेत.
सन 2019 व 2021 मध्ये पुढीलप्रमाणे गावे पुरामुळे पूर्णतः /अंशता बाधित झाली होती. वाळवा तालुका – संभाव्य 38 गावे – 1)ऐतवडे खु 2) कुंडलवाडी 3) जुनेखेड 4) वाळवा 5) शिरगाव 6) नवेखेड 7) ताकारी 8) गौंडवाडी 9) सापटेवाडी 10) दुधारी 11) चिकुर्डे 12) करंजवडे 13) थानापुडे 14) देवेर्डे 15) कणेगाव 16) भरतवाडी 17) तांदुळवाडी 18) हुबालवाडी 19) बहे 20) खरातवाडी 21) बोरगाव 22) फारणेवाडी बोरगाव 23) बनेवाडी 24) मसुचीवाडी 25) कोळे 26) शीरटे 27) नरसिंहपुर 28) मर्दवाडी 29) कृष्णानगर 30) मिरजवाडी 31) कारंदवाडी 32) कासेगाव 33) धोत्रेवाडी 34) तांबवे 35) शिगाव 36) रेठरे हरणाक्ष 37) नेर्ले 38) बिचूद
शिराळा तालुका : – संभाव्य 21 गावे – 1) मोहरे 2) काळुंद्रे 3) चरण 4) सोनवडे 5) सागाव 6) ढोलेवाडी 7) आरळा 8) पुनवत 9) मांगले 10) देववाडी 11) खुसगाव 12) कोकरूड 13) चिंचोली 14) कांदे 15) चिखली 16) बिळाशी 17)पानुम्ब्रे तर्फ वरून 18) मराठेवाडी 19) मणदूर 20) अस्व्लेवाडी 21) शिराळा खुर्द.
पलूस तालुका :- संभाव्य 25 गावे – 1) भिलवडी 2) तावदरवाडी 3) माळवाडी 4) सुखवाडी 5) चोपडेवाडी 6) खंडोबाचीवाडी 7) अंकलखोप 8) नागठाणे 9) सूर्यगाव १०) राडेवाडी 11) ब्रहमनाळ 12) खटाव १३) वसगडे 14) तुपारी 15) दह्यारी 16) घोगाव 17) दुधोंडी 18) पुणदी वाळवा 19) नागराळे 20) बुर्ली 21) आमणापूर 22) पुणदी वाडी 23) विठ्ठल वाडी 24) अनुगडे वाडी 25) पलूस.
मिरज तालुका व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका – संभाव्य 21 गावे – निलजी 2) बामणी 3) ईनाम धामणी 4) जुनी धामणी 5) अंकली 6) दुधगाव 7) सावळ वाडी 8) समडोळी 9) क. डिग्रज 10) तुंग 11) पद्माळे 12) कर्नाळ 13) मौजे डिग्रज 14) हरिपूर 15) माळवाडी 16) ढवळी 17) वड्डी 18) कवठेपिराण 19) म्हैशाळ 20) नांद्रे 21) सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका कार्य क्षेत्रातील संभाव्य परिसर.
अटी व शर्ती तसेच अधिकच्या माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सांगली (मुख्यालय-मिरज) यांचे कार्यालय, डॉ. आंबेडकर रोड, जिल्हा पशुवैद्यकिय सर्वचिकित्सालय आवार, मिरज-416410 या कार्यालयाशी (दूरध्वनी क्रमांक 0233-2222233) संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.