भिलवडी येथे शांततेत अन् चुरशीचे 67:33 टक्के मतदान : लोकांमध्ये उत्साहात
माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम आणि उमेदवार विशाल पाटील यांची भेट

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे अत्यंत चुरशीचे आणि शांततेत 67 :33 टक्के मतदान झाले. एकुण मतदान 9130,, झालेले मतदान 6138, एकुण ट क्केवारी 67 :33 टक्के. सकाळपासूनच मतदान दात्यांनी प्रत्येक बुथवर गर्दी केली होती. मतदान सुरू असताना माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम आणि सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विशाल पाटील यांनी भिलवडी येथे भेट दिली आणि मतदान दात्यांना आव्हान केले. चितळे कुटुंबाच्या सदस्यांनी ही मतदानाचा अधिकार बजावला.
भिलवडीतील सर्व पक्षाच्या पदाधिकारी हे नेत्यांनी गेल्या काही दिवसापासून आपापल्या उमेदवाराला निवडून आणण्याचा आणण्यासाठी प्रयत्न केले होते या प्रयत्नामुळे गावांमध्ये चांगले मतदान झाले.
नेहमीच भिलवडी गावातील आणि भिलवडी पोलीस ठाणे च्या हद्दीत असणाऱ्या गावांमध्ये सामाजिक बांधिलकी जपत मतदान होते .यावेळीही सांगली लोकसभेचे मतदान अत्यंत शांततेत पार पडले लोकांनी पोलिसांना चांगले सहकार्य केले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी मिरज येथे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सभा घेतली होती. या सभेमुळे अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांना नक्कीच लाभ होणार असल्याचे लोकांतून बोलले जात आहे.
सांगली लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी होणार असून याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.