
दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :- सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील ( धामणी पाडळी, ) येथील शंकर पाटील यांच्या शेतात काही अज्ञातांनी तणनाशक फवारणी केली यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत तासगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पाटील कुटुंबातील सदस्यांनी मोठी मेहनत करून , शेतात काबाडकष्ट करून भुईमूग लागवड केली होती, एकीकडे पाऊसाची रिमझिम कधीतरी बरसात आहे.तर दुसरीकडे पाऊस मोठा कधी पडणार या कडे आभाळाकडे डोळे लावून शेतकरी बसले आहेत,तसेच पेरणी शेतकऱ्यांना पेरणी करून घेतली आहे. जून आणि जुलै महिन्यात पाऊसाचे प्रमाण कमी जास्त दिसते तर कधी पावसाळ्यातच उन्हाचा चटका कशी बशी पेरलेल्या बियाण्याची उगवण चांगली आली आहे. पेरलेलं उगवलं आहेच पण यातच आता उन्हाचा पारा चढउतारा होत आहे त्यामुळे या उन्हाने पिके वाळून जातील का काय अशी भीती शेतकरी वर्गांना सुद्धा पडलेले होते त्यात रिमझिम पाऊस त्यामुळे उगवलेल्या पिकांना तरी थोडा आधार मिळाला आहे, अशातच सामान्य कुटुंबातील शेतकरी यांनी आपल्या शेतात भुईमूग सह अन्य पिकांची लागवड केली पिक चांगले आले. पण कोणी अज्ञातांनी त्या भुईमूग लागवडी मध्ये विषारी द्रव्य अशी फवारणी करून पिकांचे मोठे नुकसान केले.तर शेतकरी हतबल झाले आहेत, कोणी अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणा केला आहे तो म्हणजे विषारी द्रव्य फवारण्याने भुईमुगाचे पीक पूर्णपणे जळून खाक झाले आहे,या प्रकरणी शंकर पांडुरंग पाटील ( वय वर्षे ६५ , राहणार कवठेएकंद,ता तासगाव) यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, तासगाव पोलीसांनी दैनिक प्रीतीसंगमला दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार शंकर पाटील यांची धामणी येथे गट क्रमांक ३६१ मध्ये शेती आहे,त्यांनी १५ गुंठे शेतात ७ जूलै रोजी भुईमुगाची पेरणी केली होती,मात्र ३ ते ४ दिवसांपूर्वी अज्ञात इसमांनी या पिकावर. कोणतेतरी विषारी औषध फवारले, त्यामुळे उगवलेले संपूर्ण पिक करपून गेले, याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
