दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार):- सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विटा शहरातील नेवरी रोडवरील नेवरी नाक्याजवळील सुंदर प्लाझा येथील उत्तरप्रदेशातील विटा येथे वास्तव्यास असलेला परप्रांतीय तरुणांने खानापूर तालुक्यातील एक महिलेची ओळख करून जवळीक साधत बलात्कार केला. याबाबत विटा पोलिस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केली आहे.
तो परप्रांतीय तरुण सतत तीच्या जनसंपर्कात आला , नेहमी तो संपर्क वाढवून गप्पा गोष्टी करत बोलू लागला, पारे येथील एका किराणा मालाच्या दुकानात ओळख झाली. या ओळखीत त्या तरुणाने महिलेस मी तुझ्याशी लग्न करेल तुला संभाळीन असे अनेक आश्वासन त्या महिलेला या तरुणाने दिली, ती महिला या तरुणाच्या प्रेमात जात सदर तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून त्या महिलेवर अत्याचार केला, सदर महिलेने त्या तरुणास वारंवार लग्न कधी करायचं असा तगादा लावल्याने, त्या तरुणाने त्या महिलेस लग्नाचा नकार दिला, तसेच अपशब्द वापरले, आपली फसवणूक झाली हे महिलेच्या लक्षात आल्याने महिलेने थेट विटा पोलीस ठाण्यात धाव घेतली सदर या परप्रांतीय तरुणा विरोधात विटा पोलिसांनी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तक्रार घेत गुन्हा दाखल केला सदर विटा शहरातील नेवरी रोड लागत नेवरी नाक्यातील सुंदर प्लाझा येथे राहत असलेल्या इम्तियाज अहमंद असे या बलात्कार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे त्याच्यावर बलात्कार प्रकरण बद्दल विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, या घटनेनंतर खानापूर तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे, सदर विटा पोलिसांनी इम्तियाज अहमंद यास महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर ताब्यात घेतले आहे या नराधमाने या महिलच्या मुलीलाही धमकी दिली, जीव मारुन टाकीन , तुला जिवंत सोडणार नाही अशीही धमकी दिली होती,तर , सदर या घटनेचा तपास विटा उपविभागिय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्याही मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संग्राम पाटील हे करित आहेत.
