दर्पण न्यूज वारणानगर -;वारणानगर (जनसंपर्क कार्यालय) येथे शिराळा बाजार समितीचे माजी संचालक व सांगली जिल्हा नाभिक संघटनेचे उपाध्यक्ष प्रताप यादव व शिराळा नगरपंचायतीचे अपक्ष नगरसेवक अभिजीत यादव यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार डॉ विनय कोरे यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार) शिराळा शहर कार्याध्यक्ष तुषार यादव,युवा उद्योजक स्वानंद महाजन,विशाल लोहार,संदिप यादव,ऋषिकेश यादव,ओंकार यादव,आदित्य परदेशी,अक्षय सुतार,ऋतिक गायकवाड,शहाजी पाटील,मनोहर खिलारे,राजेश चौगुले यांच्यासह कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम,सांगली जिल्हा परिषदेच्या सदस्या साईतेजस्वी सत्यजित देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
