दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :-
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे राज्य संघटक व आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय संजयजी भोकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यामध्ये पत्रकार संघ बळकट करणार असल्याचे सांगली जिल्हा ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे नूतन जिल्हाध्यक्ष विनायक उर्फ गणेश पवार यांनी सांगितले. आज खानापूर तालुका पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक खानापूर येथे पार पडली. यावेळी ते सर्व पत्रकारांना संबोधित करत होते. प्रास्ताविक खानापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश धेंडे यांनी केले. यावेळी धेंडे म्हणाले पत्रकार संघाचे कार्य चांगल्या प्रकारे चालू असून यापुढे देखील सर्व पत्रकारांसाठी विविध योजना राबविण्याच्या मानस आहे. आपल्याला राज्य संघटक संजयजी भोकरे साहेब यांचे कणखर नेतृत्व लाभले असून त्याचा आपल्या पत्रकार संघासाठी खूपच फायदा झाला आहे व भविष्यात देखील तो मोठ्या प्रमाणावर होणार आहे. यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष विनायक पवार यांचा सर्व पत्रकारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याला उत्तर देताना विनायक पवार म्हणाले आदरणीय भोकरे साहेबांनी जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडणार असून पत्रकारांना लागेल ती सर्व मदत या पत्रकार संघाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आता लवकरच आपले स्वतःचे व हक्काचे पत्रकार भवन पूर्ण होणार असून आता आपल्याला आपले कार्यक्रम घेण्यासाठी कोणाच्याही दारात जावे लागणार नाही. हा पत्रकार संघ सर्वांच्या अडीअडचणीला धावून जाऊन मदत करणार असून सर्व पत्रकारांच्या समस्या इथे शांतपणे ऐकून घेतल्या जाणार आहेत. इथे कुणालाही दुजाभाव केला जाणार नाही. आदरणीय भोकरे साहेबांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे त्याला कोणत्याही प्रकारे तडा जाणार नाही याची दक्षता घेतली जाईल. लवकरच माननीय भोकरे साहेब आपल्या पत्रकार संघास भेट देणार असून आपल्या कामकाजाची पाहणी करणार आहेत. आपला पत्रकार संघ हा आदर्श पत्रकार संघ म्हणून गणला जाईल एवढे अभिवचन मी या निमित्ताने सर्वांना देत आहे. यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांनी आपल्या सूचना केल्या.
या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग डोंगरे तात्या, संजय डोंगरे (केसरी) दत्तात्रेय डोंगरे (जनमत), अनिल दत्त डोंगरे (सकाळ), सदाशिव डोंगरे (पुण्यनगरी), तुषार टिंगरे (तरुण भारत), अभिजीत भगत (जनप्रवास), संदीप माने (लोकमत), पोपट रास्ते (पुण्यनगरी), जब्बार पिरजादे (सह्याद्री न्यूज), हबीब मुलाणी (घाटमाथा न्यूज), राजेश जाधव (ललकार), विनायक देशपांडे (जनप्रवास), नौशाद शेख (गर्जा महाराष्ट्र), चंद्रकांत जाधव (स्टार न्युज मराठी) रमेश जाधव ,लक्ष्मण पाटील, विक्रम भिसे, याकूब शिकलगार, सागर कदम, महेश पवार (सेवन स्टार न्यूज )शिराज शिकलगार (प्रीतीसंगम) किरण भगत (जनसूर्य न्यूज) दिलीप गायकवाड (इंडिया न्यूज), महादेव धनवडे (भाळवणी एक्सप्रेस) रफिक आतार ( लोकमत), समीर मुल्ला (जनप्रवास )इत्यादी पत्रकार उपस्थित होते.
