दर्पण न्यूज मिरज/सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 25.84 टी.एम.सी.पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 67.86 (105.25), धोम 9.46 (13.50), कन्हेर 9.29 (10.10), धोम बलकवडी 3.51 (4.08), उरमोडी 7.12 (9.97), तारळी 3.91 (5.85), वारणा 25.84 (34.40), राधानगरी 7.20 (8.36), दूधगंगा 12.08 (25.40), तुळशी 2.37 (3.47), कासारी 1.96 (2.77), पाटगांव 2.18 (3.72), अलमट्टी 103.77 (123).
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे – कण्हेर धरणातून 4993, धोम बलकवडी 2034, तारळी 187, राधानगरी 1400 व अलमट्टी धरणातून 42 हजार 500 क्युसेक विसर्ग सुरू आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 13 (40) व अंकली पूल हरिपूर 15.6 (45.11).
शिराळा तालुक्यात 35.3 मि.मी. पावसाची नोंद
सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 13.9 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 35.3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 13 (214.9), जत 3.8 (161.6), खानापूर 12 (222.1), वाळवा 17.9 (294), तासगाव 11.9 (225), शिराळा 35.3 (590.4), आटपाडी 2 (178), कवठेमहांकाळ 5.9 (137.4), पलूस 14.1 (210.9), कडेगाव 18.1 (239.9).
