


दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने). :-
जंतर मंतर दिल्ली येथे विद्यार्थी आंदोलन दरम्यान 20 जुलै रोजी झालेल्या लाठीचार्ज च्या निषेधार्थ आज 23 जुलै रोजी वंचित बहुजन आघाडी चे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद ला येडशी गाव बंद करून व्यापारी संघटना व व्यापारी, दुकानदार येडशीकराणी निषेध करून बंद पाळला या बंदला शिवसेना UBT यांनी ही पाठिंबा दिला… या वेळी उपस्थित युवक तालुका अध्यक्ष . सागर चंदनशिवे, माजी तालुका अध्यक्ष पंकज शिंदे, ग्रा . स. फारुक शिकलगार, विकी शिंदे, विशाल शिंदे, नितीन होवाळ, हर्ष ओहळ, आशुतोष वाघमारे, अजित गायकवाड, विद्यार्थी व पालक वंचित चे कार्यकर्ते हे बंद मध्ये सहभागी झाले.
