
दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :–
जंतर मंतर वर चालू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन व सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण या विषयी भारत सरकारने कोणतीही चर्चा केली नाही. परंतु सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उचलून घेऊन दवाखान्यात ठेवले व आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संसद भवन वर मोर्चा काढण्याचे ठरले प्रमाणे विद्यार्थी शांतपणे संसद भवन कडे जात असताना आंदोलनातील विद्यार्थी महिला मुली व वयस्कर यांच्यावर अमानवीय लाठीचार्ज करुन अतिशय घृणास्पद काम दिल्ली पोलिसांनी केंद्र सरकारच्या सांगण्याने केले आहे. केंद्रातील सरकार व दिल्ली पोलिसांनी चुकीचे व निंदनीय काम केले आहे. देशाचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री मा अमित शहा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीचे निवेदन माहामहीम राष्ट्रपती यांना मा उपविभागीय अधिकारी कळंब यांच्या मार्फत देण्यात आले. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्र बंद च्या घोषणेमुळे कळंब शहर व परिसरातील शाळा व बाजार पेठ बंद ठेवण्यात आली व शासनाचा निषेध करण्यात आला या आंदोलनात सर्व पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी हजेरी लावली.
यावेळी अनिल हजारे कुणाल मस्के अशोक कसबे बंडूभाऊ बनसोडे सूरज वाघमारे विशाल वाघमारे शितल हौसलमल शिलवंत सुरेंद्र गौतम वाघमारे महेश गायकवाड आकाश गायकवाड आकाश खंडाळे सूनील गाडे धनंजय ताटे प्रमोद ताटे रामलिंग साळवे अजय बचुटे कुंदम कदम समीर मस्के अजित मस्के अमित जाधव आदी उपस्थित होते.
