दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :- सायबर पोलीस ठाणे :आडीबीआय खाते क्र 1458102000008990 चा धारक यांनी दि.17.12.2025 ते 23.03.2026 रोजी पावेतो ऑनलाईन पध्दतीने खातेदार आरोपी व त्याचे साथीदार यांनी संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला सायबर गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम वर्ग करण्यास देवुन त्यावर ऑनलाईन अर्थिक व्यवहार करुन भारतभरातील एकुण 15 नागरीकांची मिळुन एकुण 10,65,60,114₹ ची ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-ज्ञानेश्वर विलास सुर्यवंशी नमेणुक पोलीस ठाणे सायबर यांनी दि.18.07.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे सायबर येथे भा.न्या.सं.कलम 61(2), 318(4), 3(5), 112(2) सह 66 (सी),66(डी) आय टी ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
सायबर पोलीस ठाणे :स्टेट बॅक ऑफ इंडीया खाते क्र 0000003883809473 चा धारक यांनी दि.22.04.2026 ते 25.06.2026 रोजी पावेतो ऑनलाईन पध्दतीने खातेदार आरोपीने संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला सायबर गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम वर्ग करण्यास देवुन त्यावर ऑनलाईन अर्थिक व्यवहार करुन भारत भरातील एकुण 03 नागरीकांची मिळुन एकुण 36,92,831 ₹ ची ऑनलाईन अर्थिक फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-ज्ञानेश्वर विलास सुर्यवंशी नमेणुक पोलीस ठाणे सायबर यांनी दि.18.07.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे सायबर येथे भा.न्या.सं.कलम 318(4),320, 321, 335, 336, 340, सह 66 (सी),66(डी) आय टी ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
