
दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार )-:
विटा येथील लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श पॉलिटेक्निक कॉलेजमधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग व इलेक्ट्रिकल विभागातील ६ विद्यार्थ्यांची नेक्स्टिअर ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या राष्ट्रीय कंपनीत निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. स्वप्नील जाधव यांनी दिली.
नेक्स्टिअर ऑटोमोटिव्ह इंडियाच्या एच. आर. टीमने घेतलेल्या ॲप्टिट्यूड टेस्ट व मुलाखतीच्या आधारे या विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये माळी अवधूत श्रीकांत, मोरे शंभूराज गीतेश, घोरपडे पृथ्वीराज हणमंत, खंडागळे मंथन मोहन, शिरगावे विराज प्रमोद आणि निकम ओम विजय यांचा समावेश आहे.
नेक्स्टिअर ऑटोमोटिव्ह ही जगातील वाहन सुटे भाग (स्टीअरिंग आणि ड्राईव्हलाईन सिस्टीम्स) निर्मिती करणारी अव्वल राष्ट्रीय कंपनी असून, दर्जेदार उत्पादनांसाठी तिने जागतिक स्तरावर नावलौकिक मिळविला आहे.
संस्थेचे संस्थापक अँड सदाशिवराव भाऊ पाटील अध्यक्ष अँड वैभव दादा पाटील व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची देश-विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये निवड व्हावी यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांसाठी ॲप्टिट्यूड टेस्ट, मॉक इंटरव्ह्यू, सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग आदींचे नियमित आयोजन करण्यात येत असून, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविकेच्या अंतिम वर्षातच नोकरीची संधी मिळत आहे.
महाविद्यालयातील अद्ययावत शैक्षणिक सुविधा, आदर्श पॅटर्न, अनुभवी प्राध्यापकवर्ग, नियमित चाचण्या, दत्तक पालक योजना यांसारख्या उपक्रमांमुळे आदर्श इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. पदविकेच्या शेवटच्या सत्रातच विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळत असल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
या यशाबद्दल अध्यक्ष अँड वैभव दादा पाटील, संस्थेचे कार्यकारी संचालक मा. पी. टी. पाटील, वित्त संचालक मा. रविराज सूर्यवंशी, संचालिका मा. पुजा पाटील व प्राचार्य, सर्व शैक्षणिक अधिष्ठाते, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. स्वप्नील जाधव मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागप्रमुख प्रा. ए. बी. शेख इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग विभागप्रमुख प्राध्यापिका. एस. व्ही. जगताप, प्रा. डी. के. जाधव, प्रा.जे. व्ही. खताळ, प्रा. पी. डी. मोरे तसेच विभागातील इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
