
दर्पण न्यूज गोवा पणजी (अभिजीत रांजणे) : गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची १५ वी आवृत्ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विन्सन वर्ल्डतर्फे आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव गेल्या दीड दशकात गोव्यातील महत्त्वाच्या सांस्कृतिक उपक्रमांपैकी एक दर्जेदार उपक्रम ठरला आहे. यावर्षी ७ ते ९ ऑगस्टदरम्यान पणजी येथील आयनॉक्स आणि मॅकेनिज पॅलेस येथे होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. लोकप्रिय अभिनेते संजय दत्त हे उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील, अशी माहिती मुख्य आयोजक संजय शेट्ये यांनी दिली. यावेळी सचिन चाट्ये, श्रीपाद शेट्ये, सिद्धेश उपस्थित होते.
महोत्सवाचा उद्घाटनाचा चित्रपट महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘बंडखोर’ हा असणार आहे. महेश मांजरेकर स्वतः कलाकार आणि तांत्रिक चमूसह चित्रपटाचे सादरीकरण करणार आहेत. प्रियदर्शिनी इंदलकर, छाया कदम तसेच गोव्यातील अनेक कलाकारांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाची निर्मिती संजय शेट्ये यांनी केली असून, या चित्रपटाचा जागतिक श्रीमियर महोत्सवात होणार आहे. गोव्यात चित्रित करण्यात आलेल्या
यावर्षी सचिन खेडेकर, रेणुका शहाणे, मृणाल कुलकर्णी, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, स्वप्नील जोशी, अनिता दाते, जितेंद्र जोशी, ललित प्रभाकर, निर्मिती सावंत, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके, प्रार्थना बेहरे, नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी आणि मृन्मयी गोडबोले यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
या चित्रपटात स्थानिक कलाकार व तंत्रज्ञांचा मोठा सहभाग असून, महिलांच्या सक्षमीकरणाचा विषय यात मांडण्यात आला आहे. गोवा मराठी चित्रपट महोत्सवाशी आपले दीर्घकाळापासूनचे नाते असल्याचे सांगताना महेश मांजरेकर यांनी ‘बंडखोर’ हा चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी निवडला जाणे अत्यंत समर्पक असल्याची भावना व्यक्त केली.
महत्त्वाचे प्रीमियर आणि स्क्रिनिंग होणार आहेत. रोहन कानवडे दिग्दर्शित ‘साबर बॉड’ या चित्रपटाने सनडान्स चित्रपट महोत्सवात प्रीमियर होणारा पहिला मराठी चित्रपट म्हणून इतिहास रचला असून, त्याला तेथे वर्ल्ड सिनेमा ड्रामाटिक अँड ज्यूरी प्राइज हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय ‘क्रांतिज्योती विद्यालय’, ‘उत्तर’, ‘फस्सक्लास दाभाडे’, ‘तिघी’, ‘तो ती आणि फुजी’,
भारतीय रंगभूमी, मराठी चित्रपट तसेच हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना यंदाचा’ कृतज्ञता पुरस्कार ‘प्रदान करण्यात येणार आहे. पाच दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत.
‘मर्दिनी’, ‘भूतम भयम्’, ‘अगं अगं सुनबाई काय म्हणता सासुबाई’ आणि ‘घबाडकुंड’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्याचप्रमाणे ‘पिशवी’ आणि ‘स्रोफ्लॉवर’ या चित्रपटांचे प्रीमियर शो देखील यावेळी होणार आहेत. विविध विषय आणि शैलींचा संगम घडविणाऱ्या या चित्रपटांमुळे रसिकांना समृद्ध चित्रपटानुभव मिळणार आहे. महोत्सवाची ऑनलाइन नोंदणी लवकरच सुरू होणार आहे.
