
दर्पण न्यूज मिरज (अभिजीत रांजणे) :- मुस्लिम एज्युकेशन कमिटी, सांगली संचलित
मोहम्मदिया अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सांगली येथे संस्थेचे अध्यक्ष फारुकभाई जमादार यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या संचालक मंडळाची सभा खेळीमेळीत झाली.
सभेच्या प्रारंभी संस्थेचे माजी अध्यक्ष मा. अमानुल्ला पठाण यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष मा. फारुकभाई जमादार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे सेक्रेटरी श्री. कयूम भाई पटवेगार, संचालक असलम भाई बागवान, रफिक भाई कलास्कर, इरफान भाई शरीफ तसेच संस्थेचे सभासद अज्जू भाई पटेल व अल्ताफ मुल्ला, फिरोजभाई जमादार, एडव्होकेट समीउल्ला तहसीलदार उपस्थित होते.
या बैठकीत संस्थेच्या शैक्षणिक, प्रशासकीय व पायाभूत विकासाबाबत सखोल चर्चा करून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये—
•शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष उपक्रम राबविणे.
•विद्यार्थिनींसाठी सुसज्ज गर्ल्स हॉस्टेल सुरू करणे.
•स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी MPSC/UPSC मोफत ग्रंथालय सुरू करणे.
•विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी नवीन इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा निर्णय.
•संस्थेच्या इमारतीची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे.
•संस्थेचा सर्वांगीण विकास साधून संस्थेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याचा एकमताने निर्धार.
यावेळी अध्यक्ष मा. फारुकभाई जमादार यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी सर्व संचालक, सभासद, शिक्षक, कर्मचारी व पालक यांच्या सहकार्याने दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
“उत्तम शिक्षण, आधुनिक सुविधा आणि विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य” हे ध्येय समोर ठेवून संस्थेची वाटचाल अधिक वेगाने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी मुस्लिम एज्युकेशन कमिटी, सांगली सदैव कटिबद्ध आहे, अशा भावना जमादार यांनी व्यक्त केल्या.
