
दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी शिराज शिकलगार -: विटा हायस्कूल विटा येथे 21जून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात योगाचे महत्त्व सांगून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचा सराव केला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व पटवून दिले. नियमित योगाभ्यासामुळे शरीर तंदुरुस्त राहते, एकाग्रता वाढते आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते, असे त्यांनी सांगितले.
योगअभ्यासक ब्रह्मचारी श्री बळीराम गणपती देवळी सर रा गारगोटी यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व तसेच शारीरिक तंदुरुस्ती त्याचप्रमाणे योगाचे विविध प्रकार यांचा सराव अतिशय उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांकडून करून घेतला
या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली.
शेवटी कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री काळे सर यांनी मांडले अशा रीतीने अतिशय उत्साहात विटा हायस्कूल विटा येथे योग दिन संपन्न झाला.