
दर्पण न्यूज पलूस रामानंदनगर:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथील रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर येथे बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यालयात योग सत्राचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या प्राचार्य यू. व्ही.पाटील यांनी योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या व नियमित योगा करण्याबद्दल मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील प्राध्यापक यांना सर्व विद्यार्थ्यांना योगा वर मार्गदर्शन करत रहा हे सर्व विद्यार्थी रोज पाच-दहा मिनिटे योगा करतील याची दक्षता घ्या व विद्यार्थ्यांचे मन, मेंदू, शरीर बळकट होईल, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल असे नियोजन करावे असे त्यांनी सांगितले.
योग प्रशिक्षक प्रा. सध्या जाधव यांनी योगा प्रात्यक्षिका सह मार्गदर्शन केले. नियमित योगा केल्याचे फायदे सांगितले, एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग या हेतूने त्यांनी मार्गदर्शन केले. आपली जीवनशैली सुधारण्यासाठी आवश्यक असणारा योगा नियमित करण्याबद्दल मार्गदर्शन केले.
योग शिबिरासाठी उपप्राचार्य डॉ. गौरी पाटील, लेफ्टनंट संदेश दौंडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. धनेश गवारी यांनी योगा सराव शिबिराचे आयोजन केले.
महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट, विद्यार्थी, माजी विद्यार्थी,पालक उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी नियमित योगा करण्याचा संकल्प केला.