दर्पण न्यूज पलूस भिलवडी :-
दिनांक 19.06.2026 रोजी 21.45 वाचे सुमारास भिलवडी ते तासगाव जाणारे रोडवर जाणारे रोडवर माळवाडी येथील नवीन बस स्टँण्ड समोर रोडचे उत्तर बाजुस रोडवर दत्तात्रय सुधीर खैरमोडे वय 32 वर्षे व्यवसाय ड्रायव्हर, रा.स्वामी समर्थ कॉलनी तासगाव याने त्याचे ताब्यातील इनोव्हा गाडी क्र एम.एच 10 बी के 2121 ही रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवुन समोरून पायी चालत येत असणारा वर्दीदार यांचा चुलत भाऊ भिमराव हणमंत सुपनेकर वय 40 वर्षे, रा.लक्ष्मी मंदिराजवळ बागडी समाज माळवाडी यास समोरून जोराची धडक देवून त्यास गंभीर जखमी करून त्याचे मृत्युस कारणीभुत झाला आहे म्हणून वगैरे मजकुरची फिर्याद यातील फिर्यादी अंकुश बळवंत सुपनेकर वय 27 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा, चव्हाण प्लॉट माळवाडी, ता.पलुस, जि.सांगली यांनी दिलेने दि.20.06.2026 रोजी भिलवडी पोलीस ठाणे सीसीटीएनएस गु र नं 87/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब) प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्राचा तपास सपोनि किरण दिडवाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रोहिदास पावशे व पोलिस कर्मचारी करीत आहेत.