दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :- स्वर्गीय दिलेर बाळासाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आणि स्वर्गीय शिवाजी देशमुख यांच्या स्मरणार्थ दिलेर प्रतिष्ठानच्या वतीने आज गौर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल ५५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान करून एक आदर्श सामाजिक संदेश दिला.
प्रतेक रक्तदात्यास दिलेर प्रतिष्ठान तर्फे स्कूल बैग व टिफिन डबा भेटवस्तू देण्यात आली
रक्तदानाच्या माध्यमातून स्व. दिलेर बाळासाहेब देशमुख आणि स्व.शिवाजी देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. समाजहिताची जपणूक आणि गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
यावेळी दिलेर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिद्धांत भैया देशमुख,गोविंद देशमुख,संदीप धोंगडे सरपंच धनंजय देशमुख, पंचायत समिती सदस्य शामदादा देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत माने तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष रमेश सर देशमुख,विकास कदम सर,अनिल सर देशमुख,मयूर देशमुख,पृथ्वीराज पवार,वेदांत देशमुख,जय ताकपीरे,प्रणव गोरे,प्रतीक देशमुख,उमेश देशमुख,संदेश देशमुख,धीरज जगदाळे,वैभव कुंभार,अण्णा साळुंके,राजेश शिरसागर व स्व. बाळासाहेब देशमुख यांचे चाहते, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व. बाळासाहेब देशमुख यांनी आयुष्यभर जपलेल्या समाजसेवेच्या आणि लोकहिताच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. रक्तदानासारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमातून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आल्याने हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.