
विटा खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार) -:
स्वच्छ भारत अभियान – स्वच्छ सर्वेक्षण करिता विटा नगरपरिषदने पहाटेच्या वेळी काही बेजबाबदार नागरिक परिसर अस्वच्छ करत आहेत हे निदर्शनास येताच मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी मॉर्निंग पथक तयार करून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत
विटा नगरपरिषद च्या नगराध्यक्षा सौ. काजलताई म्हेत्रे,उपनगराध्यक्ष श्री. अमोलदादा बाबर,आरोग्य सभापती श्री.भालचंद्रभैय्या कांबळे यांच्या मार्गदर्शनखाली मॉर्निंग पथकाने मुळस्थान गुंफा परिसर रेवणसिद्ध देवस्थान परिसर, रेवानगर परिसरात पहाटे 4 पासून पेट्रोलिंग केले.
यावेळी पहाटेच्या वेळी काही नागरिक उघड्यावर शौचास जाणारे व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर वॉच ठेवण्यात आला.
नागरिकांनी शहर स्वच्छतेसाठी योगदान द्यावे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास किंवा परिसर अस्वच्छ केल्यास पथकद्वारे कडक दंडात्मक कारवाई केली जाईल असे आवाहन ही मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी केले आहे.
मॉर्निंग पथकाने पहाटे 4 वाजेलपासून स्पॉट कारवाई ला सुरुवात केली. नगरपालिकेच्या या धडक कारवाई मुळे परिसर अस्वछ करणाऱ्या नागरिकांवर वचक बसली आहे.
आरोग्य निरीक्षक संदीप वाघमारे,संजय भिंगारदेवे, श्रीकांत साठे, अर्जुन सूर्यवंशी, विनोद यादव, शरद बोडरे यांचे यासाठी मोलाचे सहकार्य लाभले
या पथकात नितीन चंदनशिवे, अभि गायगवळे, सुरज मंडले, महेश झाडे, आकाश कदम, विजय चंदनशिवे, प्रमोद भोसले, बुद्धिवान आंबवडे, अभिजित ममदापुरे आदींचा समावेश होता