
दर्पण न्यूज खानापूर विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :- सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरा नजीकच्या वासुंबे गावात विटा वासु़ंबे रोडवर रात्री १०/३० च्या सुमारास एक चारचाकी गाडी घेऊन कुटुंबातील सदस्य घरी निघाले होते, याच वेळी अचानक गाडीचा लाईटचा प्रकाश हा वळणावर रस्त्याकडेला झाडाझुडपात पडला यावेळी अचानक या प्रकाशामुळे समोरच बिबट्याचे दर्शन झाले, प्रकाश पडल्यामुळे बिबट्या घाबरलेल्या अवस्थेत पळू लागला, मात्र या चार चाकी वाहनातील कुटुंबाने गाडीच्या सर्व काचा बंद करून घेतल्या, अगर बिबट्याने गाडीवर झेप मारली तर काय होईल या भीतीपोटी गाडी जागेवर थांबवण्यात आली, बिबट्याने तिथून धूम ठोकण्याचा यशस्वी प्रयत्न करत झाडाझुडपात त्या परिसरात निघून गेला, तरीही गाडी चालक यांनी गाडी घेऊन जाताना रस्त्यावरून कमी स्पीडने घेऊन गेला आजूबाजूला कुठे अजून काही बिबटे आहेत का? याचीही शहनिशा करत आपल्या मोबाईलवर गाडी चालकाने चित्रकरण केले, ज्या भागा वस्तीवर बिबट्या झाडाझुडपात ने निघून गेला ते त्या गाडी चालकाच्या मोबाईल मध्ये चित्रकरण झाले आहे, सदर या बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तेव्हा वासुंबे व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना शेतकऱ्यांना या भागात बिबट्या आला आहे सावधानता रहा अशी सुचनाही देण्यात आली,तर वन विभागाचे अधिकारी यांनी तत्काळ या परिसरात असणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी वासुंबे भांबर्डे व आजूबाजूच्या वस्तीतील नागरिक ग्रामस्थ शेतकरी वर्गाने केली आहे, आता शाळा सुरू झाल्याने या रस्त्यावरून शालेय विद्यार्थ्यांची सायकलीने रहदारी असल्याने कधी काही घडेल सांगता येणार नाही असे म्हणत ग्रामस्थांनी वन विभागाला संबंधित अधिकारी यांना विनंती केली आहे की सदर या बिबट्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी यंत्रणा सतर्क करावी अशी विनंती ग्रामस्थ नागरिक यांनी केली आहे,